IND vs ENG : एजबेस्टन कसोटीत भारतीयांवर वंशभेदी टीका करणाऱ्यांवर होणार कारवाई, इंग्लंड क्रिकेटने दिली माहिती
ECB : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीय फॅन्सवर वंशभेदी टीका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड कारवाई करणार आहे.
England and Wales Cricket Board : भारत आणि इंग्लंड (india vs england) यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान एजबेस्टनच्या (Edgbaston) मैदानात काही इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीय फॅन्सवर (Indian Fans) वंशभेदी टीका (Racial Abuse) केल्याचा प्रकार चौथ्या दिवशी घडला. ज्यानंतर काही भारतीय फॅन्सनी हा प्रकार ट्वीटरवर शेअर करत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली. ज्यानंतर आता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) याबद्दल कारवाई करणार असल्याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.
'आम्ही संबधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत'
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) एजबेस्टन कसोटीत घडलेल्या सर्व प्रकाराबाबत ट्वीट करत कारवाई करणार असल्याची माहिती दिली असून अशाप्रकारचा प्रकार कोणत्या फॅनसोबत घडला असेल किंवा तुम्ही घडताना पाहिला असेल तर त्याची माहिती द्यावी, असंही नमूद केलं आहे. तसंच आम्ही संबधितांशी संपर्कात असून क्रिकेटमध्ये अशा प्रकारांना अजिबात जागा नाही, असंही म्हटलं आहे.
England and Wales Cricket Board expressed concern about the reports of "racist abuse at (yesterday's) Test match. We are in contact with colleagues at Edgbaston who will investigate. There is no place for racism in cricket." pic.twitter.com/RgnRGdMk8z
— ANI (@ANI) July 5, 2022
ट्वीट करत फॅन्सनी दिली माहिती
भारत सात विकेट्सनी पराभूत
तर संबंधित कसोटी सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करताना चौथ्या आणि पाचव्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि जो रुट जोडीने (Johny Bairstow and Joe Root) तुफान शतकं ठोकत इंग्लंडला विजय मिळवून दिला. मागील वर्षी सुरु झालेल्या मालिकेतील हा उर्वरीत पाचवा कसोटी सामना होता. मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर होता, ज्यामुळे हा सामना जिंकल्यास भारत मालिकाही जिंकला असता. पण इंग्लंडने सामना जिंकल्याने मालिकाही अनिर्णीत सुटली आहे.
हे देखील वाचा-
- IND Vs ENG : ऋषभ पंतच्या दोन चूकांमुळे टीम इंडियाला झाला मोठा तोटा, वाचा नेमकी चूक कुठे झाली?
- IND Vs ENG: हनुमा विहारीची एक चूक पडली भारी, बेअरस्टोचा झेल सोडला अन् सामनाच फिरला!
- Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक