IND vs WI, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील पहिली मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?
India vs Wesi indies ODI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.
![IND vs WI, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील पहिली मॅच, कधी, कुठे पाहाल सामना? ENG vs WI 1st ODI Live Streaming When Where To Watch India vs Wesi indies ODI Live Telecast Online IST IND vs WI, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील पहिली मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/22/1390ebb0c953448139b076d628699cb71658483796_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs West Indies Live : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना (1st ODI) सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा पहिलाच सामना असल्याने सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेईल. भारताने नुकतच इंग्लंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय आणि टी20 मालिकेत मात दिल्यानंतर आता वेस्ट इंडीजला मात देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. तर आजचा हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 22 जुलै रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन याठिकाणी खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-
- World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)