(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wasim Jaffer: 'हम करे तो साला कैरेक्टर ढीला...', लॉर्ड्स कसोटीवरून वसीम जाफरचा इंग्लंडवर निशाणा
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड (England vs New Zealand) दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या (London) लॉर्ड्सवर (Lords) खेळला जात आहे.
ENG vs NZ 1st Test: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड (England vs New Zealand) दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या (London) लॉर्ड्सवर (Lords) खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी विकेट्सचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी पूर्ण दिवसाच्या खेळात न्यूझीलंडच्या सर्व 10 विकेट पडल्या होत्या. त्याचवेळी यजमान इंग्लंडनंही सात विकेट्स गमावल्या. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका गाण्यातील शिर्षकाचा फोटो शेअर करून इंग्लंडला ट्रोल केलंय.
वसीम जाफर काय म्हणाला?
भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनं पहिल्या दिवसाच्या खेळावर एक मनोरंजक पोस्ट केली. ज्यात त्यानं असं म्हटलं की "भारतीय खेळपट्टीवर असं काही घडलं असतं तर, टीका झाली असती. लॉर्ड्सवर एका दिवसात 17 विकेट पडतात, तेव्हा हे सर्व गोलंदाजांच्या कौशल्यावर अवलंबून असते. जेव्हा अहमदाबादमध्ये एका दिवसात 17 विकेट पडतात, तेव्हा परिस्थितीबद्दल चर्चा होते", अशा शब्दात वसीम जाफरनं इंग्लंडचा समाचार घेतला.
ट्वीट-
इंग्लंडचा डाव 141 धावांवर ढेर
पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 132 धावांवर आटोपला. कॉलिन डी ग्रँडहोमनं नाबाद 42 आणि टीम साऊदीनं 26 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि पदार्पण करणाऱ्या मॅटी पॉट्सने प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. इंग्लंडचा संघ त्यांच्या पहिल्या डावात 141 धावांवर ऑलआऊट झाला. सलामीवीर जॅक क्रॉलीनं 43 आणि अॅलेक्स लीसनं 25 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून टीम साऊथीनं चार आणि ट्रेन्ट बोल्टनं तीन विकेट्स घेतल्या. तर, काईल जेमसनला दोन विकेट्स मिळाल्या.
हे देखील वाचा-