England : इंग्लंडला पाकिस्तान पाठोपाठ बॅगा भराव्या लागणार, अँटिग्वात पावसाची बॅटिंग सुरु, सुपर 8 ची लॉटरी कुणाला लागणार?
ENG vs NAM : इंग्लंड विरुद्ध नामिबिया ही मॅच सुरु होण्यास पावसामुळं उशीर झाला आहे. ही मॅच रद्द झाल्यास इंग्लंड टी 20 वर्ल्डकपच्या बाहेर पडू शकतो.
अँटिग्वा : टी 20 वर्ल्ड कप 2024 (T 20 World Cup 2024) मध्ये पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळं काही मॅचेस रद्द कराव्या लागल्या आहेत. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच रद्द झाल्यानं पाकिस्तानला (Pakistan) घरचा रस्ता पकडावा लागला. आज भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच देखील पावसानं रद्द करावी लागली. या दोन्ही मॅचेस फ्लोरिडात होणार होत्या. दुसरीकडे इंग्लंडचं (England) टी 20 वर्ल्ड कपमधील भविष्य देखील टांगणीला लागलं आहे. इंग्लंड आणि नामिबिया (ENG vs NAM) यांच्यातील मॅचला पावसामुळं उशीर झाला आहे. पावसामुळं मॅच रद्द करावी लागल्यास इंग्लंडला पाकिस्तान प्रमाणं बॅगा भराव्या लागू शकतात.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये ब गटातून ऑस्ट्रेलियानं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. ब गटातून सुपर 8 मध्ये कोणता संघ प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब गटातील गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, स्कॉटलँड 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड 3 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडची नामिबिया विरुद्धची महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून नेट रनरेटच्या आधारे सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचं इंग्लंडचं नियोजन आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांची मॅच देखील शिल्लक आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत करावं लागेल. ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यातील मॅच पावसानं रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक गुण मिळतील, अशा स्थितीत देखील इंग्लंडचा संघ बाहेर जाण्याची भीती आहे.
नामिबिया विरुद्धची मॅच रद्द झाल्यास इंग्लंडला फटका
इंग्लंडला सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असल्यास कसल्याही परिस्थितीत नामिबियाला पराभूत करणं आवश्यक आहे. ही मॅच रद्द झाल्यास इंग्लंडचं आव्हान संपुष्टात येईल. इंग्लंडला सुपर 8 मध्ये प्रवेश करायचं असल्यास अँटिग्वामधील पाऊस थांबून मॅच होणं महत्त्वाचं आहे. जर मॅच रद्द झाली तर इंग्लंडचा टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपेल. दरम्यान, भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री अडीच वाजता इंग्लंड आणि नामिबिया यांच्या मॅचबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या अँटिग्वामध्ये पाऊस सुरु आहे.
न्यूझीलंड पाकिस्तान बाहेर
यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान या सारखे दिग्गज संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत. आतापर्यंत सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत, अमेरिका, अफगाणिस्तान हे सहा संघ पोहोचले आहेत.
संबंधित बातम्या :
IND vs CAN : अखेर भारत विरुद्ध कॅनडा मॅच रद्द, रोहितसेना सुपर 8 मध्ये कुणाविरुद्ध लढणार, जाणून घ्या