Eng vs Ind 4th Test Day 3 : चौथ्या कसोटीत इंग्लंडचा वरचष्मा, तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले, इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी
India Vs England 4th Test Update : तिसरा दिवस निर्णायक ठरणार आहे. भारताला जिंकायचं असेल, तर गोलंदाजांनी कंबर कसावी लागणार आहे.
LIVE

Background
India Vs England 4th Test Day 3 Live Score : मँचेस्टर कसोटीमध्ये इंग्लंडने चांगली पकड निर्माण केली आहे. भारताचा पहिला डाव 358 धावांवर आटोपल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात 225 धावा केल्या आहेत. जो रूट 11 आणि ऑली पोप 20 धावांवर खेळत आहेत. इंग्लंड अजूनही भारतापेक्षा 133 धावा मागे आहे, पण त्यांच्या हाती 8 गडी बाकी आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली नाही, तर सामना हातातून निसटण्याची शक्यता आहे.
इंग्लंडची दमदार सुरुवात
दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी मजबूत सुरुवात केली. ओपनर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी 32 षटकांत पहिल्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी रचली. बेन डकेटने 100 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 94 धावा केल्या. फक्त 6 धावांनी त्याचा शतक हुकलं. त्याला अंशुल कंबोजने बाद केलंआणि हे कंबोजचं पहिलं टेस्ट विकेट ठरलं. दुसरा ओपनर झॅक क्रॉलीने 113 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 13 चौकार मारत 84 धावा केल्या. त्याला रविंद्र जडेजाने माघारी पाठवलं.
बुमराह-सिराज निष्प्रभ
भारताचे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अजून प्रभाव टाकू शकलेले नाहीत. सामना भारताच्या बाजूने वळवायचा असेल, तर तिसऱ्या दिवशी बुमराह-सिराजला धारदार गोलंदाजी करावी लागेल. नाहीतर इंग्लंड पहिल्या डावात आघाडी घेईल आणि भारतासाठी अडचणी वाढतील. थोडक्यात, तिसरा दिवस निर्णायक ठरणार आहे, भारताला जिंकायचं असेल, तर गोलंदाजांनी कंबर कसावी लागणार आहे.
चौथ्या कसोटीत इंग्लंडचा वरचष्मा, घेतली 186 धावांची आघाडी
मँचेस्टर कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 7 विकेट गमावून 544 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा पहिला डाव 358 धावांपर्यंत मर्यादित राहिल्याने इंग्लंडची पहिल्या डावात एकूण आघाडी 186 धावांपर्यंत वाढली आहे. तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत कर्णधार बेन स्टोक्स 77 धावा करून खेळत आहे, त्याच्यासोबत लियाम डॉसन देखील क्रीजवर खंबीरपणे उभा आहे.
इंग्लंडला सहावा धक्का! जो रूटनंतर जेमी स्मिथ OUT, आघाडी 150 च्या पुढे
जसप्रीत बुमराहने इंग्लंडला सहावा धक्का दिला. त्याने जेमी स्मिथला आऊट केले. तो फक्त नऊ धावा करू शकला. इंग्लंड संघाची आघाडी 150 च्या पुढे गेली आहे.




















