Eng vs Ind 3rd Test Day-5 : चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय
Eng vs Ind 3rd Test News : एजबेस्टनवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्स जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
LIVE

Background
India vs England, 3rd Test, Day 5, Live Score : एजबेस्टनवर मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया लॉर्ड्स जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. लॉर्ड्स टेस्टचा पाचवा दिवस थरारक ठरणार आहे, कारण दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणार हे नक्की.
भारत 58 धावांवर 4 बाद या स्थितीतून पाचव्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात करणार आहे. इंग्लंडने भारतासमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. लॉर्ड्सवर भारताने शेवटचा यशस्वी रनचेस 1986 साली केला होता, तेव्हा 136 धावांचं लक्ष्य होतं. यंदा लक्ष्य थोडंसं मोठं असलं, तरी भारताने विजय मिळवला तर ही लॉर्ड्सवर चौथ्या इनिंगमध्ये केलेली ऐवजी दुसरी ऐतिहासिक रेकॉर्ड जीत ठरेल.
या सामन्याची सुरुवात इंग्लंडच्या पहिल्या डावाने झाली होती, त्यांनी 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही तितक्याच, म्हणजे 387 धावा केल्या. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ही केवळ नववी वेळ होती, जेव्हा दोन्ही संघांचे पहिल्या डावाचे स्कोअर बरोबरीत राहिले. भारतासाठी मात्र ही तिसरी वेळ होती, जेव्हा त्याचा पहिला डाव टाय झाला.
पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात अपयशी ठरलेला इंग्लंड दुसऱ्या डावातही लवकर कोसळला. त्यांचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. त्यामुळे भारतासमोर 193 धावांचं आव्हान उभं राहिलं आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मात्र, जो संघ लॉर्ड्समध्ये विजय मिळवेल, तो 2-1 आघाडी घेईल आणि मालिकाजिंकण्याची संधी त्याच्याकडे अधिक प्रबळ होईल.
चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव, जडेजाची मेहनत गेली पाण्यात, इंग्लंडचा 22 धावांनी विजय
इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव केला. सोमवारी लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमान संघाने भारतीय संघाला 170 धावांवर गुंडाळले आणि सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्याआधी बेन स्टोक्सच्या संघाने लीड्स कसोटीत भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. त्याच वेळी, भारतीय संघाने दुसरी कसोटी (एजबॅस्टन कसोटी) 336 धावांनी जिंकली.
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 10 विकेट्सच्या मोबदल्यात 378 धावा केल्या. त्यांच्याकडून जो रूटने 104 आणि जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सने 51 आणि 56 धावा केल्या. त्यानंतर भारतानेही 10 विकेट्सच्या मोबदल्यात 387 धावा केल्या. त्यांच्याकडून केएल राहुलने 100, ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने 10 विकेट गमावून 192 धावा केल्या आणि भारतासमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले, जे भारतीय संघ साध्य करू शकला नाही आणि 170 धावांवर ऑलआऊट झाला.
रवींद्र जडेजाने 150 चेंडूत ठोकले अर्धशतक
रवींद्र जडेजाने 150 चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 25 वे अर्धशतक पूर्ण केले. सध्या तो ५३ धावांसह क्रीजवर उभा आहे. त्याला साथ देण्यासाठी सिराज क्रीजवर उपस्थित आहे. भारताला विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे.




















