Video : 'किंग कोहलीसोबत चालायला मिळालं, माझं जीवन सफल झालं', विराटचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिलात का?
IND vs ENG : सध्या भारतीय संघा इंग्लंडविरुद्धच्या एकमेवस कसोटी सामन्यासाठी कसून सराव करत आहे. यावेळी विराटच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष्य लागून आहे.
Virat Kohli Viral Video : भारतीय संघ (Indian Team) सध्या इंग्लंडच्या (England) दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी आणि प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी20 सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान याआधी भारतीय खेळाडूंचे सोशल मीडियावरील पोस्ट बरेच व्हायरल होत आहेत. कधी विराट-रोहित शॉपिंगला तर कधी पंत गरीबाची मदत करताना अशा पोस्ट व्हायरल होत असताना आता कोहलीचा एक व्हिडीओ एजबेस्टन (Edgbaston) क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे, यामध्ये एक कॅमेरामन सराव करुन परतणाऱ्या विराटसोबत चालताना त्याच्याशी बातचीत करत असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे या कॅमेरामनने विराट अर्थात किंग कोहलीसोबत चालायला मिळालं माझं जीवन सफल झालं, अशा भावना दर्शवल्या असून व्हिडीओलाही हेच कॅप्शन दिलं गेलं आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा युवा सलामीवीर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) सराव करुन बाहेर पडत असतो. ड्रेसिंग रूमच्या (Dressing Room) दिशेने जाताना एक कॅमरामन विराट कोहलीचा (Virat Kohli) व्हिडीओ बनवत असतो, तो त्याच्या मागे मागे चालत असतो. याचवेळी विराट मागे फिरून हसत त्याला ‘वॉट्स अप ?’, असं विचारतो. हाच व्हिडीओ एजबेस्टन (Edgbaston) क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला असून 75 सेकंदच्या या व्हिडीओला नेटकरीही पसंती देत आहेत.
पाहा VIDEO
𝗪𝗮𝗹𝗸𝗶𝗻𝗴 𝘄𝗶𝘁𝗵 𝘁𝗵𝗲 𝗸𝗶𝗻𝗴. 👑
— Edgbaston (@Edgbaston) June 29, 2022
My life is complete. #Edgbaston | #ENGvIND pic.twitter.com/Ij6kDbnuAA
उद्यापासून रंगणार कसोटी सामना
मागील वेळी भारतीय संघाला 5 सामन्यांच्या कसोची मालिकेतील अखेरचा सामना कोरोनाच्या संकटामुळे खेळता आला नव्हता. हाच सामना या दौऱ्यात खेळवला जाणार आहे. 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात हा एकमेव कसोटी सामना पार पडल्यावर पुढील सामने खालीलप्रमाणे होतील.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-
Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?