India vs England : भारतापाठोपाठ इंग्लंडनेही जाहीर केले एकदिवसीय आणि टी20 संघ, अनेक युवा खेळाडूंना संधी
ENG vs IND : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यानंतर टी20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी इंग्लंडने नुकताच संघ जाहीर केला आहे.
India vs England : भारतीय संघ(Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या कसोटी सामना खेळवला जात आहे. मागील दौऱ्यातील उर्वरीत कसोटी सामना सध्या सुरु असून यानंतर प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघ जाहीर केल्यानंतर आता इंग्लंडनेही त्यांचा संघ जाहीर केला आहे. नुकतात जोस बटलर संघाचा कर्णधार झाला असून त्याच्या नेतृत्त्वाखाली या सामन्यांत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे.
सध्या एजबेस्टन टेस्ट खेळत असल्याने बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो सारखे दिग्गज खेलाडू टी20 मालिकेत नाहीत. कारण 5 जुलै रोजी कसोटी सामना संपल्यावर लगेचच 7 जुलै रोजी टी20 सामना सुरु होईल, यामुळे या दिग्गज खेळाडूंना विश्रांती आवश्यक असल्याने ते संघात दिसणार नाहीत. पण एकदिवसीय संघात मात्र सर्व दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. नेमका इंग्लंडचा स्कॉड कसा आहे पाहूया...
भारताविरुद्ध टी20 सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, रिचर्ड ग्लेसन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, मॅट पर्किंसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रीस टॉपले आणि डेविड विले.
भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, हॅरी ब्रूक, ब्रेडन केयर्स, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओवरटन, मॅट पर्किंसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि डेविड विले.
कसं असेल भारत विरुद्ध इंग्लंड वेळापत्रक?
टी-20 मालिका वेळापत्रक
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-
- Anderson to Pujara : अँडरसन पुजाराची पाठ सोडेना, मालिकेतील पाचही सामन्यांच्या पहिल्या डावात धाडलं तंबूत
- IND vs ENG 5th Test : अँडरसन-ब्रॉड जोडी भारतीय फलंदाजाविरुद्ध मैदानात उतरणार, इंग्लंडने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
- Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार