Dinesh Karthik: एक-दोन नव्हे तर, तब्बल 9 कर्णधाराच्या नेतृत्वात खेळलाय दिनेश कार्तिक!
Dinesh Karthik: भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकसाठी (Dinesh Karthik) यंदाचं वर्ष आतापर्यंत चांगलं गेलंय.
Dinesh Karthik: भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकसाठी (Dinesh Karthik) यंदाचं वर्ष आतापर्यंत चांगलं गेलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्यानं दमदार कामगिरी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. दिनेश कार्तिक भारतीय संघाच्या नऊ कर्णधारांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाय.
दिनेश कार्तिकचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
दिनेश कार्तिकनं 2004 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात पहिला सामना खेळला. त्याची वर्षी त्यानं कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केलं होतं. राहुल द्रविडच्या नेतृत्वात त्यानं पहिला कसोटी सामना खेळला. दरम्यान, 2006 पासून टी-20 क्रिकेटला सुरुवात झाली. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात 2006 मध्ये भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्यावेळी दिनेश कार्तिक भारतीय टी-20 संघाचा भाग होता.
कोणकोणत्या खेळाडूच्या नेतृत्वात खेळला दिनेश कार्तिक?
गांगुली, द्रविड आणि सेहवागच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कार्तिकनं एमएस धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि आता रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकानंतर आता भारतीय संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेत दिनेश कार्तिक भारतीय संघाच भाग आहे.
आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी
यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकनं चमकदार कामगिरी करून दाखवली. बंगळुरूकडून खेळताना कार्तिकनं संघासाठी फिनिशरची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. या हंगामातील 15 सामन्यात कार्तिकनं 10 वेळा नाबाद राहात 324 धावांचा पाऊस पाडलाय. आरसीबीकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हे देखील वाचा-