एक्स्प्लोर

Yashasvi Jaiswal : जैस्वालचा संपणार नाही वनडेतला वनवास? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळणार नाही संधी; स्टार खेळाडूने सांगितले कारण

Dinesh Karthik on Yashasvi Jaiswal Champions Trophy 2025 : टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माचे पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आहे.

ICC Champions Trophy 2025 India Squad : टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माचे पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. अशा स्थितीत स्पर्धेला बराच वेळ शिल्लक असतानाही खेळाडूंच्या निवडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील बहुतेक खेळाडूंना कायम ठेवण्याची चर्चा जास्त होत आहे. पण सध्या यशस्वी जैस्वाल हे एक नाव आहे. ज्याने आपल्या गेल्या वर्षी कसोटी आणि टी-20 मध्ये कारकिर्दीची चांगली सुरुवात केली, पण त्याला अद्याप एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. 

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पार्श्वभूमीवर भारताच्या सलामीच्या कॉम्बिनेशनवर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले आहे की, यशस्वी जैस्वाल 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग असेल, परंतु सध्या त्याला सलामीवीर म्हणून प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणे कठीण आहे.

कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल अजूनही वनडेमध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे. शेवटच्या टी-20 वर्ल्ड 2024 मध्ये विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग केल्यामुळे यशस्वीला बाहेर बसावे लागले होते. 

क्रिकबझवरील संभाषणात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय खेळाडूंच्या निवडीवरील प्रश्नांची उत्तरे देताना दिनेश कार्तिक म्हणाला, "ओपनर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी उत्कृष्ट आहे. त्याचवेळी यशस्वी जैस्वाल बॅकअप सलामीवीर म्हणून संघात सामील होऊ शकते. जर शुभमनने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही तर अशा परिस्थितीत जैस्वाल नक्कीच संधी मिळेल." पण एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी सलामी दिली होती. गिलने या स्पर्धेत 354 धावा केल्या होत्या. 

यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ फक्त तीन एकदिवसीय सामने खेळणार असल्याचे कार्तिकने म्हटले आहे. अशा स्थितीत सलामीच्या जोडीचा प्रयोग होण्याची शक्यता फारच कमी आहे. तो म्हणाला, 'भारत त्यांच्या सलामीच्या जोडीवर जास्त प्रयोग करणार नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांच्याकडे फक्त काही सामने शिल्लक आहेत.' त्यामुळे जैस्वालला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी कधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरही संकट 

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा निर्णयही आयसीसीला घ्यायचा आहे. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण आयोजन करेल की हायब्रीड मॉडेल स्वीकारेल याबाबतचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे, कारण बीसीसीआयने पाकिस्तान न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने भारताच्या खेळांचा विचार करणाऱ्या वेळापत्रकाचा मसुदा आधीच आयसीसीकडे सादर केला आहे. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये संभाव्य सेमीफायनल आणि फायनलसह भारत त्यांचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मार्की सामना 1 मार्च रोजी होणार आहे.

संबंधित बातमी :

फक्त 2 चेंडूत खेळ खल्लास! 'अरे, त्याला झिम्बाब्वेविरुद्ध खेळवा...' बाबर आझम होतोय ट्रोल
Jaydev Unadkat : 400 हून अधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाने घेतला मोठा निर्णय, आता 'या' देशात खेळणार क्रिकेट

IPLच्या स्टारचा झाला मोठा अपघात! मानेला चेंडू लागल्याने गंभीर जखमी; हॉस्पिटलमध्ये दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget