एक्स्प्लोर

Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी

IPL 2025 RCB: दिनेश कार्तिकनं 2024 चं आयपीएल संपल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, आरसीबीनं    दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी दिली आहे.  

Dinesh Karthik IPL 2025 RCB  बंगळुरु : दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) आयपीएलमधून (IPL2024) निवृत्ती जाहीर केली होती. दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये सहा संघांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. दिनेश कार्तिकनं शेवटचं आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलं होतं. आरसीबीचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर दिनेश कार्तिकनं आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली होती. आता आरसीबीनं दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी टाकली आहे. दिनेश कार्तिक आता आरसीबीचा बॅटिंग कोच आणि मेंटॉर असेल. 

 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिनेश कार्तिकला मोठी जबाबदारी सोपवल्याचं जाहीर केलं आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) साठी दिनेश कार्तिकवर आरसीबीच्या बॅटिंग कोच आणि मेंटर पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आरसीबीनं सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. दिनेश कार्तिकनं निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आरसीबीतर्फे नव्या भूमिकेत आयपीएलमध्ये कमबॅक होणार आहे. दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल संपल्यानंतर दिनेश कार्तिक आयसीसीच्या कॉमेंटेटर्सच्या पॅनेलवर देखील होता.  

आरसीबीनं दिनेश कार्तिक संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दिनेश कार्तिक नव्या भूमिकेत कबॅक करत असल्याचं म्हटलं. तुम्ही एखाद्याला क्रिकेटमधून बाहेर करु शकता. पण, त्याच्यामध्ये असलेल्या क्रिकेटला बाहेर काढू शकत नाही, असं देखील आरसीबीनं म्हटलं आहे.  

दिनेश कार्तिकचं दमदार करिअर

दिनेश कार्तिकची आपीएलमधील कामगिरी दमदार राहिली आहे. दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये 257 मॅच खेळल्या असून यामध्ये त्यानं 4842 धावा केल्या आहेत. यामध्ये दिनेश कार्तिकनं 22 अर्धशतकं केली आहेत. दिनेश कार्तिकच्या सर्वाधिक धावा 97 इतक्या आहेत. दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या 17 व्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. दिनेश कार्तिकनं 2024 च्या आयपीएलमध्ये 15 मॅचमध्ये 326 धावा केल्या होत्या. यानंतर दिनेश कार्तिकनं निवृत्ती जाहीर केल आहे. 

संबंधित बातम्या : 

रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह, टीम इंडियाच्या सहा शिलेदारांना मानाचं पान, आयसीसीचा मोठा निर्णय
 
'मला खूप वाईट वाटलं...'; रोहित शर्माच्या निवृत्तीने पत्नी रितिका भावूक, पोस्टद्वारे सर्व बोलली

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaNawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP MajhaBhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Embed widget