एक्स्प्लोर

महेंद्रसिंह धोनीचा क्रिकेटविश्वात खळबळ माजवणारा निर्णय; आजच्या दिवशी दोन वर्षापूर्वी करोडो चाहत्यांची तोडली मनं

On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपेकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.

On This Day: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपेकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. धोनीचे भारतातचं नव्हे तर, संपूर्ण जगभरात चाहते आहेत. दरम्यान,15 ऑगस्ट 2020 रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात न्हाऊन निघाला होता, त्याच वेळी संध्याकाळी एक बातमी आली, ज्या बातमीनं क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. ती म्हणजे यापुढं महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नाही. धोनीच्या या निर्णयाला आज दोन वर्ष पूर्ण झाली. 
 
महेंद्रसिंह धोनीनं 26 डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 वाजल्यापासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं  होतं. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला होता.

धोनीची इन्स्टाग्राम पोस्ट-

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.

आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक  आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.

धोनीची आयपीएलमधील कामगिरी
आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं आतापर्यंत चार वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाच्या यादीत चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, मुंबई इंडियन्सचा संघ पाच ट्रॉफीसह अव्वल स्थानी आहे. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
भुवनेश्वर कुमारचं कमबॅक, अभिषेक शर्मा, वैभवला डच्चू,रविचंद्रन अश्विनची वनडे वर्ल्ड कपसाठी ड्रीम टीम
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget