एक्स्प्लोर

हॅरी ब्रूकची अचानक माघार, इंग्लंडने धाकड खेळाडूला पाठवलं भारत दौऱ्यावर

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबाद येथे होणार आहे.

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हैदराबाद येथे होणार आहे. त्यासाठी इंग्लंडचा संघ हैदराबाद येथे दाखल झालाय. इंग्लंड संघाने आज हॅरी ब्रूक याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.  स्टार फलंदाज हॅरी ब्रूक संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. वैयक्तिक कारणांमुळे हॅरी ब्रूकने आपले नाव मागे घेतल्याचे समजतेय. इंग्लंडने हॅरी ब्रूकच्या जागी डेन लॉरेंस याची निवड केली आहे. तो पुढील 24 तासांमध्ये इंग्लंडच्या संघासोबत जोडला जाईल, असे ईसीबीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. 

हॅरी ब्रूकने माघार घेतल्यानंतर ईसीबीने तात्काळ रिप्लेसमेंटची घोषणा केली. ईसीबीने ट्वीटमध्ये म्हटले की, ''डेन लॉरेंस भारतविरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघासोबत जोडला जाईल. पुढील 24 तासांत तो टीमसोबत असेल.''  त्याआधी हॅरी ब्रूक याने कसोटीतून माघार घेतल्याचे ईसीबीला कळवलं होतं. ईसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, "हॅरी ब्रूक याने वैयक्तिक कारणांमुळे भारताविरोधातील कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तो इंग्लंडला परतला आहे. ब्रूक कुटुंबाने यावेळी लोकांकडून गोपनीयतेची विनंती केली आहे." 

डेन लॉरेंस गोलंदाजीही करतो - 

डेन लॉरेंस याला दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येण्याची संधी मिळाली आहे. याआधी 2021 मध्ये झालेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतही डेन लॉरेंस इंग्लंड संघाचा सदस्य होता. अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात डेन लॉरेंस याने पहिल्या डावात 46 आणि दुसऱ्या डावात 50 धावांची खेळी केली होती. 2021 मध्ये इंग्लंड संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. 2021 मध्ये डेन लॉरेंस याने इंग्लंड संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यात 551 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 29 इतकी आहे. 

डेन लॉरेंस फलंदाजीशिवाय गोलंदाजीही करु शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये डेन लॉरेंस याच्या नावावर तीन विकेट आहे. डेन लॉरेंस फिरकी गोलंदाजी करतो. डेन लॉरेंस याने नुकतेच बिग बैश लीगमध्ये हॉबर्टविरोधात खेळताना चार विकेट घेतल्या आहेत. 

इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान. 

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - 

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  

पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget