लॉकडाऊनमुळे मिळालेला सक्तीचा ब्रेक क्रिकेट खेळाडूंचं करिअर वाढवू शकतो : पीटरसन
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहता अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जवळपास तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर काही देशांमध्ये खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
![लॉकडाऊनमुळे मिळालेला सक्तीचा ब्रेक क्रिकेट खेळाडूंचं करिअर वाढवू शकतो : पीटरसन Criket News Former england captain kevin believes break might help increase career लॉकडाऊनमुळे मिळालेला सक्तीचा ब्रेक क्रिकेट खेळाडूंचं करिअर वाढवू शकतो : पीटरसन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/26150849/icc-g.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मागील जवळपास तीन महिन्यांपासून आंतराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू केल्यामुळे अनेक क्रिकेटर्स घरांमध्ये कैद आहेत. दरम्यान, इंग्लंड संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन याला असं वाटतं की, 'लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या ब्रेकमुळे काही खेळाडूंचं करिअर वाढू शकतं. दरम्यान, 13 मार्च रोजी शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता.
पीटरसनने एक ट्वीट करत लिहिलं आहे की, 'मला असं वाटतं की, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सक्तीच्या ब्रेकमुळे अनेक महिला आणि पुरुष खेळाडूंचे करिअर वाढलं आहे. दबावामुळे मिळालेली मानसिक सुट्टी पुन्हा खेळावरील त्यांचं प्रेम वाढवण्यासाठी मदत करणार आहे आणि हे पाहण खरचं औत्सुक्याचं ठरणार आहे.'
खेळांना पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न
जवळपास तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर काही देशांमध्ये खेळ पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्ड सर्वात पुढे आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मागील आठवड्यापासून आपल्या गोलंदाजांना मैदानावर प्रॅक्टिस करण्यासाठी सूट दिली आहे. दरम्यान, फलंदाजांना मात्र मैदानावर परतण्याासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.'
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड देखील आपल्या खेळाडूंना लवकरच ट्रेनिंग सुरु करण्याची परवानगी देऊ शकतात. दरम्यान, भारतीय क्रिकेटर्सना मैदानावर पुन्हा ट्रेनिंग सुरु करण्यासाठी मात्र अजून वाट पाहावी लागू शकते.
बीसीसीआयने कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आधीच आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. याच कारणामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्व चषक स्पर्धा होणार की, नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
...म्हणून वडिलांनी लाच देण्यास नकार दिला होता; विराट कोहलीचा धक्कादायक खुलासा!
कोरोनानंतरही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भीती कायम असेल : राहुल द्रविड
'माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक', सुरेश रैनाला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास
माझी पत्नी लियोनेल मेस्सीची फॅन, पण आमचा मेस्सी धोनीच : सुरेश रैना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)