(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'महाराष्ट्राची मिसळ पाव 1 नंबर!', मिसळीचा आस्वाद घेताना सचिननं शेअर केला खास व्हिडीओ
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं, त्यामुळे तो जे काही करतो त्याच्याकडे त्याच्या चाहत्याचं खास लक्ष असतं. सध्या सचिननही सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो.
मुंबई : क्रिकेट म्हणजे भारतीयासांठी (Cricket) अगदी आवडीचा विषय. भारतीयांना क्रिकेटचं वेड लावण्यात सर्वात मोठा वाटा असणारा खेळाडू म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच फटकेबाजी करत आहे. तो नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सचिनने सुट्टीचा दिवस अर्थात रविवार त्याचा आवडीचा एक पदार्थ खाण्याने सुरु केल्याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरुन दिली.
हा पदार्थ म्हणजे महाराष्ट्राचा खास पदार्थ 'मिसळ-पाव' (Misal Pav) सचिनने मिसळ पाववर ताव मारत रविवारची सुट्टी एन्जॉय केली आहे. यावेळी त्याने 'महाराष्ट्राची मिसळ पाव म्हणजे 1 नंबर', असं म्हणत मिसळ या चविष्ट पदार्थचं कौतुकही केलं आहे. सचिनला विविध पदार्थ खाण्याची आवड असल्याचं याआधीच्या त्याच्या अनेक पोस्टमधून समोर आलं आहे. तसचं त्याला स्वत:लाही जेवण करायला खूप आवडतं असल्याचंही त्याने सांगितलं आहे. अलीकडे सचिन इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असतो. इंस्टाग्रामवर (Instagram) सचिन तेंडुलकरचे 32.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सचिनची धांसू कारकिर्द
सचिन तेंडुलकरने 24 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 34 हजाराहून अधिक धावा केल्या. कसोटीत सचिन तेंडुलकरने 51 शतकांसह 15921 तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांसह 18426 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा
- Yuvraj Singh Birthday : डरबनचे मैदान, युवराजची बॅट अन् इंग्लंडची दाणादाण
- Yuvraj Singh : ‘मी पुन्हा येतोय’! क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची युवराज सिंहची घोषणा
- अॅशेसच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय, इंग्लंडचा दारुण पराभव, पण धक्का भारताला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha