एक्स्प्लोर

अॅशेसच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय, इंग्लंडचा दारुण पराभव, पण धक्का भारताला!

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 9 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. पण याचा धक्का भारतीय कसोटी संघाला बसला आहे.

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) 9 विकेट्सनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ WTC Ranking अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणवत्ता यादीत थेट दोन नंबरवर पोहोचला आहे. ज्यामुळे भारत तिसऱ्या स्थानावर खाली घसरत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मागील वर्षीपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC स्पर्धा खेळवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या होणारे सर्व आंतरराष्ट्रीय कसोटी सामने हे या स्पर्धेत विजयासाठीच खेळवले जात आहेत. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यासाठी संघाला त्यांच्या वर्षभरातील कसोटी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करुन जिंकण्याची टक्केवारी सर्वाधिक ठेवावी लागते.

दरम्यान मागील WTC नंतर भारताने आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये इंग्लंडविरुद्ध 4 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. ज्यातील 3 सामने जिंकत, 2 ड्रॉ आणि एक भारत पराभूत झाला आहे. त्यामुळे भारताची विजयी होण्याची टक्केवारी 58.33 टक्के आहे. तर श्रीलंका संघाने 2 पैकी 2 सामने जिंकल्यामुळे त्यांची विजयी होण्याची टक्केवारी 100 टक्के आहे. ज्यानंतर आता ऑस्ट्रेलिया WTC च्या यंदाच्या वर्षातील पहिलाच सामना जिंकत त्यांनीही विजयी होण्याची टक्केवारी 100 टक्के करत दुसरं स्थान पटकावलं आहे. तर पाकिस्तान संघाने 4 पैकी 3 सामने जिंकले असून एक सामना पराभूत झाल्यामुळे त्यांची विजयी होण्याची  75 टक्के  आहे. त्यामुळे हे तिघेही अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून भारत चौथ्या स्थानी आहे.

असा झाला Ashes चा पहिला सामना

सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला होता. इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 147 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिला डावात धावांचा डोंगर उभारला. ट्रेव्हिस हेडने 152 धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 425 धावा उभारत 278 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने 297 धावांवर गुंडाळला. ज्यामुळे विजयासाठी आवश्यक केवळ 20 धावा इंग्लंडने एक विकेट गमावत पूर्ण केल्या आणि सामना 9 विकेट्सनी जिंकला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
विश्वविजेत्या टीम इंडियाची पार 'लंका' लागली! ...आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?
IND VS ENG ODI Series Schedule : टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
टी-20 संपली! आता वनडेचा थरार; IPL नंतर पहिल्यांदाच विराट-रोहित एकत्र मैदानात उतरणार, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचं संपूर्ण Schedule
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget