Irfan Pathan Tweet : 'माझा देश जगातील सर्वात सुंदर देश होऊ शकतो, पण...', इरफान पठाणच्या ट्वीटला अमित मिश्राचं उत्तर
इरफान पठाणने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो सध्या विविध क्रिकेट संबधित शोजमध्ये प्रचंड सक्रिय असून तो अनेकदा त्याच्या ट्वीट्समुळेही चर्चेत येतो.
Irfan Pathan : क्रिकेटच्या मैदानात (Cricket) अष्टपैलू खेळीने सर्वांची मनं जिंकणारा इरफान पठाण (Irfan Pathan) अलीकडे मात्र कॉमेन्ट्री आणि विविध क्रिकेटींग शोजमध्ये तुफान अॅक्टिव्ह असतो. त्यात आता तो एका ट्वीटमुळे अधिक चर्चेत आला आहे. इरफानने आज पहाटेच्या सुमारास एक देशाबद्दलचं ट्वीट केलं. ज्या ट्वीटनंतर विविध प्रतिक्रिया त्यावर येत होत्या. क्रिकेटपटू अमित मिश्राने (Amit Mishra) देखील आपलं मत या ट्वीटवर दिलं आहे. तर नेमके हे ट्वीट्स काय आहेत पाहूया...
सर्वात आधी इरफानने (Irfan Pathan Tweet) आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भारताबद्दल एक ट्वीट केलं. त्याने यावेळी लिहिलं की, 'माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता ठेवतो. पण……' इरफानच्या या ट्वीटमधून त्याने देशातील एकंदरीत परिस्थितीबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.
इरफानच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आपआपली मतं दिली. अमित मिश्रानेही यावर त्याची प्रतिक्रिया देत या प्रश्नार्थक ट्वीटचं जणू उत्तर दिलं. त्याने लिहिलं की, 'माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता आहे... हे तेव्हाच होईल जेव्हा देशातील प्रत्येकाला आपलं संविधान महत्त्वाचं असून त्याचं पालन केलं जाणं अधिक महत्त्वाचं आहे.' दरम्यान या दोघांच्या या ट्वीट्सवर इतरही नेटकरी रिप्लाय देत असल्याचं दिसून येत आहे.
हे देखील वाचा-
- DC vs RR, Pitch Report : आज दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
- IPL 2022, DC vs RR : आज दिल्ली-राजस्थान आमने-सामने; कधी, कुठे पाहाल सामना?
- CSK Vs MI: पोलार्डला बाद करण्यासाठी धोनीनं लढवली अनोखी शक्कल; अन् पुढच्याच चेंडूत पडली विकेट! पाहा व्हिडिओ
- MS Dhoni: आजही तीच दहशत, तोच दरारा! अखेरच्या षटकात धोनीनं कसा पलटवला सामना? पाहा व्हिडिओ