Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धूंच्या सुटकेबाबत मोठी अपडेट, 1 एप्रिलपर्यंत होऊ शकते सुटका, पत्नी नवज्योत कौर म्हणाल्या...
Navjot Singh Sidhu News: काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची लवकरच सुटका होऊ शकते. पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी हा दावा केला असून 1 एप्रिलपर्यंत त्यांची सुटका होऊ शकते असं म्हटलं आहे.
Punjab Congress : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या पत्नी डॉ.नवज्योत कौर सिद्धू यांनी नवज्योत यांच्या सुटकेबाबत माहिती दिली आहे. 1 एप्रिलपर्यंत त्यांची सुटका होऊ शकते असं त्या म्हणाल्या. तसंच माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि बादल कुटुंबावर देखील त्यांनी सडकून टीका केली. नवज्योत कौर (navjot kaur) म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि बादलांच्या कारस्थानामुळे नवज्योत सिंग सिद्धू आज तुरुंगात आहेत. तसंच त्यांची 1 एप्रिलपर्यंत सुटका होऊ शकते, असंही त्या म्हणाला. कौर यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरही निशाणा साधला.
नवज्योत कौर सिद्धू (navjot kaur siddhu) डेरा बस्सी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि बादल कुटुंबावर निशाणा साधला आणि अमृतपाल प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया त्यांनी दिली. नवज्योत कौर म्हणाल्या की, आम्ही सरकारसोबत आहोत, जो कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
'सिद्धूचे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित'
नवज्योत कौर सिद्धू यांनी पती नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचंही यावेळी म्हणाल्या. एका पेन ड्राईव्हचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की पंजाबच्या एका मंत्र्याला त्यांच्याकडून पेन ड्राईव्ह देण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांचे पती नवज्योतसिंग सिद्धूच्या निर्दोषतेचा पुरावा होता, परंतु तरीही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काहीही केले नाही. याशिवाय दक्षता रडारवर काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांवर बोलताना नवज्योत कौर म्हणाल्या की, ज्यांनी जे काम केले त्यांना त्याची फळे मिळाली पाहिजेत. नवज्योत सिंग सिद्धू यांची सुटका प्रजासत्ताक दिनी होणार होती. परंतु काही कारणास्तव ते होऊ शकले नाही, यासाठी नवज्योत कौर यांनी संताप व्यक्त केला की, कट्टर गुन्हेगार, गुंड, ड्रग लॉर्ड, बलात्काऱ्यांना सरकारी धोरणानुसार जामीन मिळू शकतो पण प्रामाणिक व्यक्तीला जो गुन्हा केला नाही त्याचाही त्रास भोगावा लागतो. त्याला न्याय आणि दिलासा नाकारला जातो. असंही त्या म्हणाल्या.
प्रकरण नेमकं काय?
27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा नवज्योत सिद्धू हे क्रिकेटपटू होते. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला मारहाण केलं. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.
हे देखील वाचा-