IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार चेतेश्वर पुजाराची पुन्हा एन्ट्री, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत मिळाली 'ही' मोठी जबाबदारी!
Cheteshwar Pujara Border Gavaskar Trophy IND vs AUS: 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत आहे.
Cheteshwar Pujara Ind vs Aus 1st Test : 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत आहे. उभय संघांमधील पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, असे काही खेळाडू आहेत, ज्यांना संघात स्थान मिळवता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या चेतेश्वर पुजारालाही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. मात्र, आता या मालिकेत पुजारा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
2019 मध्ये भारताने जेव्हा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत पराभूत केले तेव्हा चेतेश्वर पुजाराचे योगदान खूप महत्त्वाचे होते. मात्र, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि तो पुनरागमन करू शकला नाही. नव्या खेळाडूंच्या आगमनामुळे पुजाराला पुनरागमन करता आले नाही.
CHETESHWAR PUJARA AS COMMENTATOR....!!!!! 📢
— Johns. (@CricCrazyJohns) November 18, 2024
- Pujara will be doing commentary for Star Sports Hindi in Border Gavaskar Trophy. pic.twitter.com/qNhybHxNZR
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजारा दिसणार 'या' भूमिकेत
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर झाला, तेव्हा त्यात चेतेश्वर पुजाराचे नाव नव्हते. पुजारासारख्या अनुभवी फलंदाजाला या महत्त्वाच्या मालिकेतून वगळण्यात आल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंना आश्चर्य वाटले. मात्र, आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजारा नव्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, चेतेश्वर पुजारा भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत समालोचक म्हणून काम करेल. तो स्टार स्पोर्ट्स हिंदीवर कॉमेंट्री करताना दिसणार आहे.
असे अनेक खेळाडू आहेत जे क्रिकेट खेळताना किंवा निवृत्तीनंतर कॉमेंट्रीमध्ये हात आजमावतात. दिनेश कार्तिक आणि स्टीव्ह स्मिथ याची उत्तम उदाहरणे आहेत. स्टीव्ह स्मिथची आयपीएलसाठी निवड झाली नव्हती, त्यावेळी त्याने कॉमेंट्री केली होती. आता चेतेश्वर पुजाराही असेच काम करताना दिसणार आहे.
रोहितशिवाय टीम इंडिया मैदानात उतरणार?
टीम इंडिया पर्थ कसोटीत रोहित शर्माशिवाय मैदानात उतरू शकते. रोहित पर्थ कसोटी खेळणार नाही. तो आताच दुसऱ्यादा बाबा झाला आहे. त्यामुळे रोहितला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. ॲडलेड कसोटीतून तो मैदानात परतू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो.
पुजाराची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द
पुजाराने 2010 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण सामना खेळला होता. तर 2023 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला. पुजाराने टीम इंडियासाठी आतापर्यंत 103 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 7195 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी द्विशतकही झळकावले आहे. पुजाराने कसोटीत 19 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 206 धावा आहे. आता पुजारा क्रिकेटनंतर कॉमेंट्री करतानाही दिसू शकतो.
हे ही वाचा -
Shreyas Iyer : संघाची घोषणा! श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी