जय शाह यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ICC ॲक्शन मोडवर... Champions Trophyवर बोलावली तातडीची बैठक, 29 तारखेला फैसला
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी आयोजित केली जाणार आहे, अद्याप अजून पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
ICC Champions Trophy Schedule 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी आयोजित केली जाणार आहे, अद्याप अजून पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेळापत्रक जाहीर केलेले नाही. भारताने यापूर्वीच पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्याच वेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) देखील हायब्रिड मॉडेलसाठी तयार नाही. या गोंधळादरम्यान आयसीसीने बैठक बोलावली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीची बैठक 29 नोव्हेंबरला (शुक्रवार) होणार आहे. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर चर्चा होणार आहे.
जय शाह यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी होणार 'ही' बैठक
आयसीसीच्या प्रवक्त्याने मंगळवारी आयसीसीला सांगितले की, 29 नोव्हेंबर रोजी सर्व आयसीसी बोर्डांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर चर्चा होणार आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याच्या दोन दिवस आधी ही बैठक होणार आहे. ते 1 नोव्हेंबर रोजी आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.
The ICC has called for a board meeting on November 29, hoping to get a clear answer on where and how the 2025 Champions Trophy will be played
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 26, 2024
Full story: https://t.co/IjoC1kxLRf pic.twitter.com/XEnlXDJDUr
भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यात दिला नकार
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. बीसीसीआयने यापूर्वीच भारतीय संघाला शेजारच्या देशाच्या दौऱ्यावर पाठवण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयने आयसीसीला ही माहिती दिली. त्याचवेळी आयसीसीने पीसीबीलाही याबाबत माहिती दिली आहे. प्रत्युत्तरात, पीसीबीने बीसीसीआयला आयसीसीला ईमेलद्वारे लिखित स्वरूपात प्रवास न करण्याचे कारण विचारले आहे.
Okay so the @ICC has finally called the Board Meeting on Friday, November 29th to discuss and finalise Champions Trophy schedule.
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) November 26, 2024
जर भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाऊ शकते. मात्र, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी यापूर्वीच ही सूचना फेटाळून लावली आहे. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, जर पीसीबीने हायब्रीड मॉडेलला सहमती दिली तर यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.
हे ही वाचा -