एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 Team India: यशस्वी जैस्वालला काढलं अन् आवडत्या खेळाडूला स्थान दिलं; टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मोठा बदल, नेमकं काय घडलं?

Champions Trophy 2025 Team India: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात 12 फेब्रुवारीपर्यंत अंतिम बदल करण्याची मुदत आयसीसीने सर्व संघांना दिली होती.

Champions Trophy 2025 Team India: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) थरार यावेळी पाकिस्तान आणि युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. टीम इंडियाचे (Team India) सर्व सामने यूएईमध्ये होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील. मात्र त्याआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जसप्रीत बुमराहऐवजी वेगान गोलंदाज हर्षित राणाचा (Harshit Rana) संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत एक पत्रक काढत माहिती दिली.

सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्याबाबतही बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यशस्वी जैस्वालला राखीव खेळाडूच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वालच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याला संघात निवडले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी काही दिवसांआधीच बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला होता. यावेळी 15 सदस्यीय संघात यशस्वी जैस्वालला स्थान देण्यात आले होते. परंतु आता त्याला 15 सदस्यीय संघातून काढून त्याच्याजागी वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे नेमकं काय घडलं?, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान, 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात 12 फेब्रुवारीपर्यंत अंतिम बदल करण्याची मुदत आयसीसीने सर्व संघांना दिली होती. यानुसार भारताने मंगळवारी (11 फेब्रुवारी) रात्री उशीरा आपला अंतिम संघ जाहीर केला. 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ (Team India Squads Champions Trophy 2025)-  

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती

संबंधित बातमी:

मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Embed widget