एक्स्प्लोर

Champions Trophy 2025 Ind vs Pak Match: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; दिग्गज खेळाडूला आला ताप, शुभमन गिलची माहिती

Champions Trophy 2025 Ind vs Pak Match: टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत उपस्थित होता.

Champions Trophy 2025 Ind vs Pak Match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील (Champions Trophy 2025 Ind vs Pak) हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा सामना आज (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा सामना दुपारी 2.30 वाजता खेळवण्यात येईल. भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला काहीही करुन विजय मिळवावा लागेल. जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताला धक्का बसला आहे.

ऋषभ पंतला आला ताप- 

टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिल शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत उपस्थित होता. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल शुभमन गिला म्हणाला की, हा एक मोठा सामना आहे, पण कोणत्याही स्पर्धेतील सर्वात मोठा सामना हा अंतिम सामना असतो. दरम्यान, दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळणारी टीम इंडिया आयसीसी अकादमीमध्ये सराव करत आहे. शनिवारी, विराट कोहलीसह काही खेळाडू वेळेच्या 1 तास आधी पोहोचले आणि सराव सुरू केला. यानंतर उर्वरित खेळाडू सरावासाठी आले पण यष्टीरक्षक ऋषभ पंत आला नाही. त्यामुळे पत्रकार परिषदेत शुभमन गिलला ऋषभ पंतबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ऋषभ पंतला ताप आल्याची माहिती शुभमन गिलने दिली. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

भारताचा संपूर्ण संघ (Team India) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जड़ेजा,  कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह 

पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Team) :

बाबर आझम, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (उप-कर्णधार), मोहम्मद रिजवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, इमाम-उल-हक

संबंधित बातमी:

Champions Trophy 2025 Points Table: ग्रुप A अन् ग्रुप B...; भारत, ऑस्ट्रेलियापासून दक्षिण अफ्रिका, इंग्लंडपर्यंत, कोण कितव्या स्थानावर?, पाहा चॅम्पियन्स ट्रॉफीचे Points Table

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India vs Netherlands : विश्वचषकात टीम इंडियाचा विजयाचा 'चौकार'! लिंबू टिंबू नेदरलँडसनं झुंजवलं, शेवटच्या षटकात विजय; आता सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
विश्वचषकात टीम इंडियाचा विजयाचा 'चौकार'! लिंबू टिंबू नेदरलँडसनं झुंजवलं, शेवटच्या षटकात विजय; आता सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
India vs Netherlands : 13 षटकार, 11 चौकार अन् फलकावर 193 धावा! शिवम दुबेची धमाकेदार फलंदाजी, हार्दिक पांड्याही चमकला, नेदरलँड्सला धू-धू धुतले
13 षटकार, 11 चौकार अन् फलकावर 193 धावा! शिवम दुबेची धमाकेदार फलंदाजी, हार्दिक पांड्याही चमकला, नेदरलँड्सला धू-धू-धुतले
Abhishek Sharma : ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?
ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, त्यानेच दिल्या जखमा; अभिषेक शर्माच्या नावे इतिहासातील 'काळा' रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?
T20 World Cup 2026 Super 8 Schedule : 9 दिवसांत, 12 सामने... टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर; भारत, पाकिस्तानचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही
9 दिवसांत, 12 सामने... टी-20 विश्वचषक 2026 सुपर-8 चे वेळापत्रक जाहीर; भारत, पाकिस्तानचे सामने कधी?, जाणून घ्या सर्वकाही

व्हिडीओ

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Embed widget