Breaking: हार्दिक पांड्या पुढील दोन सामन्याला मुकणार, फिट झाल्यानंतर टीम इंडियाने का घेतला निर्णय ?
Hardik Pandya injury update : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या लागोपाठ दुसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बां
Hardik Pandya injury update : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळं विश्वचषकातल्या (World Cup 2023) लागोपाठ दुसऱ्या साखळी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पंड्याचा घोटा दुखावला (Hardik Pandya injury) होता. त्यामुळं गेल्या रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून हार्दिक पंड्याची उद्या फिटनेस चाचणी घेण्यात येईल. या फिटनेस चाचणीनंतरच त्याच्या भारताच्या विश्वचषक संघातल्या पुनरागमनाची तारीख निश्चित करण्यात येईल. विश्वचषकातला भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी इंग्लंडशी (IND vs ENG) होणार आहे. हा सामना लखनौमध्ये होणार असून, त्यात तीन फिरकी गोलंदाजांना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हार्दिक पंड्याला आणखी विश्रांती मिळू शकते.
हार्दिक पंड्याला झालेली दुखापत आणि त्याला विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमधून माघार घ्यावी लागणं भारतीय संघासाठी किती धक्कादायक आहे. भारतीय संघात समतोल साधण्याच्या दृष्टीनं हार्दिक पंड्यात अंतिम अकरा जणांमध्ये असणं किती महत्त्वाचं आहे. हार्दिक पंड्या सध्या बेंगळुरुमधील एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. गुरुवारी हार्दिक पांड्याची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर त्याच्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या वृत्तनुसार हार्दिक पांड्याच्या फिटनेसमध्ये सुधार आहे. तो खेळण्यासाठी तयारही झालाय. पण खबरदारी म्हणून त्याला आणखी आराम देण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या पुढील दोन सामन्यासाठी हार्दिक पांड्याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
Hardik Pandya has been struggling with a leg injury and missed the last match against New Zealand. Fans are hoping for his comeback.#HardikPandya #IndianCricketer #WorldCup #ODI #WC2023 #WC23 #BetBarter pic.twitter.com/4kts9tjRz8
— BetBarter (@BetBarteronline) October 25, 2023
Hardik Pandya ruled out of ICC World Cup 2023 clash against England
— ASports (@asportstvpk) October 25, 2023
Watch Free HD Live Streaming on #ARYZAP: https://t.co/gOUkf3wj8l
Follow our WhatsApp channel: https://t.co/Elz4xCtH0A#ASportsHD #CWC23 #INDvENG https://t.co/0dJ73QsRQK
भारत आणि इंग्लंड संघामध्ये रविवारी लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनौला लवकरच दाखल होणार आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौच्या मैदानात आर. अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण, लखनौची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे एका वेगवान गोलंदाजाला आराम दिला जाऊ शकतो. मोहम्मद सिराजला आराम देण्याची शक्यता आहे. इंग्लंडनंतर टीम इंडिया मुंबईत श्रीलंका संघाविरोधात खेळणार आहे. या सामन्यातही हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता नाही. दक्षिण आफ्रिकेविरोधात पांड्या उपलब्ध असेल.