Video: सूरतमध्ये सीएसकेचा सराव सुरु, धोनीला पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले फॅन्स
IPL 2022 : यंदाही आयपीएलचा रणसंग्राम चेन्नई सुपरकिंग्स यांच्या सामन्यानेच होणार आहे. सीएसकेसमोर यंदा मात्र मुंबई नाही तर केकेआरचा संघ असणार आहे.
CSK Practice : आयपीएल (IPL 2022) 2022 साठी चेन्नई सुपर किंग्सने सराव सुरु केला आहे. सध्या संघ सूरतमध्ये असून त्याठिकाणी ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना हा सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात असून या सामन्याला काही दिवसंच शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी वानखेडे मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅम्प सूरतमध्ये लागला असून कर्णधार एमएस धोनीला पाहण्यासाठी धोनी फॅन्सनी चक्क रस्त्यावर गर्दी केली आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्सच्या सूरतमधील कॅम्पचा पहिला दिवस होता. यावेळी कर्णधार धोनीसह इतर खेळाडू सराव करत असून त्यांना पाहण्यासाठी अनेक जणांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचा व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे.
आयपीएल 2022 मधील सीएसकेचं वेळापत्रक
सामना | कधी | कुठे | कुणाबरोबर |
पहिला | 26 मार्च | वानखेडे स्टेडियम, मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स |
दुसरा | 31 मार्च | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | लखनौ सुपरजायंट्स |
तिसरा | 3 एप्रिल | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | पंजाब किंग्स |
चौथा | 9 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | सनरायजर्स हैदराबाद |
पाचवा | 12 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | आरसीबी |
सहावा | 17 एप्रिल | एमसीए स्टेडियम, पुणे | गुजरात टायटन्स |
सातवा | 21 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | मुंबई इंडियन्स |
आठवा | 25 एप्रिल | वानखेडे स्टेडियम, मुंबई | पंजाब किंग्स |
नववा | 1 मे | एमसीए स्टेडियम, पुणे | सनरायजर्स हैदराबाद |
दहावा | 4 मे | एमसीए स्टेडियम, पुणे | आरसीबी |
अकरावा | 8 मे | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | दिल्ली कॅपिटल्स |
बारावा | 12 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | मुंबई इंडियन्स |
तेरावा | 15 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | गुजरात टायटन्स |
चौदावा | 20 मे | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | राजस्थान रॉयल्स |
हे देखील वाचा-
- IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर
- IND vs SL, 1st Test: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- MS Dhoni: 'स्वप्न सत्यात उतरलं' महेंद्रसिंह धोनीला भेटल्यानंतर पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha