एक्स्प्लोर

Ajit Agarkar News : रोहित-विराटची कारकीर्द वेळेपूर्वीच संपवल्याचा कलंक, बीसीसीआयचा अजित आगरकरांबाबत महत्त्वाचा निर्णय

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे.

BCCI Chief Selector Ajit Agarkar News : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, जर या दोघांनी या मालिकेत चांगले प्रदर्शन केले नाही, तर त्यांना संघातून वगळले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांना या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. पण आता अजीत आगरकर यांच्याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

बीसीसीआयचा अजित आगरकरांबाबत महत्त्वाचा निर्णय

बीसीसीआयने अजीत आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पुढेही कार्यरत राहतील. भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आगरकर जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता बनले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या आयसीसी विश्वचषकात अंतिम फेरी गाठली, तसेच 2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या यशामुळे बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले, “त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक विजेतेपदे जिंकली, तसेच टेस्ट आणि टी20 स्वरूपात बदल घडले. बीसीसीआयने त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला असून, आगरकर यांनी काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव मान्य केला आहे.”

सध्याच्या निवड समितीत अजीत आगरकर यांच्यासोबत एस. एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरत यांचा समावेश आहे. मात्र सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर या समितीत बदल होण्याची शक्यता आहे. शरत यांना समितीतून वगळले जाऊ शकते, तर दास आणि बॅनर्जी यांच्या पदांबाबतही पुनर्विचार होऊ शकतो. बैठकीनंतर बीसीसीआय नवीन नियुक्त्यांसाठी अर्ज मागवेल.

महिला निवड समितीतही बदल संभव

वरिष्ठ महिला आणि कनिष्ठ पुरुष निवड समित्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या महिला समितीत नीतू डेव्हिड, आरती वैद्य आणि मिंटू मुखर्जी यांचा समावेश आहे. या समितीने आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, बीसीसीआयच्या नियमानुसार हा कमाल कार्यकाळ आहे. त्यामुळे लवकरच नव्या सदस्यांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत.

हे ही वाचा -

Mohsin Naqvi VIDEO : टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळालेला मोहसीन नक्वी आता पाकिस्तानात तोंड लपवून पळतोय, नेमकं काय घडलं? 'तो' व्हिडिओ व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
Embed widget