एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Mohsin Naqvi VIDEO : टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळालेला मोहसीन नक्वी आता पाकिस्तानात तोंड लपवून पळतोय, नेमकं काय घडलं? 'तो' व्हिडिओ व्हायरल

28 सप्टेंबर 2025 रोजी आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला (Ind vs Pak Asia Cup 2025) पुन्हा एकदा पराभूत करत नऊव्यांदा किताब पटकावला.

Mohsin Naqvi Asia Cup Trophy Questions : 28 सप्टेंबर 2025 रोजी आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला (Ind vs Pak Asia Cup 2025) पुन्हा एकदा पराभूत करत नऊव्यांदा किताब पटकावला. पाकिस्तानी संघ 20 षटकांत 146 धावांत गारद झाला. त्यानंतर विद्यमान विजेता भारताने 5 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना तिलक वर्माने (Tilak Varma Ind vs Pak Final) हरिस रौफच्या चेंडूला मिडविकेट स्टँडमध्ये षटकार मारला आणि त्यानंतर रिंकू सिंगने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. यादरम्यान, सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला. 

त्यानंतर मोहसीन नक्वी जे पाकिस्तानचे गृह मंत्रीदेखील आहेत, त्यांनी ट्रॉफी आणि विजेत्या खेळाडूंचे मेडल्स स्टेडियममधून थेट आपल्या हॉटेलमध्ये नेले. त्यामुळे भारतीय संघाला अधिकृतरीत्या ट्रॉफी देण्यात आली नाही. मीडिया अहवालांनुसार, सध्या आशिया कपची ट्रॉफी एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या ताब्यात आहे. मात्र, ती भारताकडे कधी आणि कशा प्रकारे सुपूर्द केली जाणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी आशिया कप 2025 च्या ट्रॉफीविषयी विचारले असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

नक्वींची पळवाट... नेमकं काय घडलं? 'तो' व्हिडिओ व्हायरल

या आठवड्यात नक्वी पाकिस्तानच्या फिरकीपटू अबरार अहमदच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी माध्यमांनी त्यांना गंभीर प्रश्न विचारले. पाकिस्तानच्या टाइम्स ऑफ कराची (TOK Sports) यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, नक्वी माध्यमांच्या प्रश्नांपासून पळू जाण्याचा प्रयत्न करत गाडीकडे गेले. त्यांना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी गाडीपर्यंत सोडतो. व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने विचारले की, “आशिया कप ट्रॉफीचे पुढे काय?” या प्रश्नावर नक्वी काहीही न बोलता स्मित करत कारमध्ये बसले आणि निघून गेले. आशिया कपदरम्यान मोठमोठ्या धमक्या देणारे नक्वी आता मात्र आपल्या देशातील माध्यमांसमोर गप्प बसले आहेत.

बीसीसीआयची प्रतिक्रिया 

नक्वींवर जबाबदारी संहिता आणि औपचारिक प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. भारतीय संघाला ट्रॉफीपासून वंचित ठेवून त्यांनी एसीसी प्रमुख म्हणून आपल्या कर्तव्याचे उल्लंघन केले असून क्रिकेट प्रशासनाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवला आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की हे प्रकरण आयसीसीसमोर मांडले जाईल. आगामी आयसीसी बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून, सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय नक्वी यांच्या विरोधात महाभियोगाची मागणी करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयचे मत आहे की, नक्वी यांचे वर्तन आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन यामुळे आशियाई क्रिकेट परिषद आणि आयसीसी या दोन्ही संस्थांच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का बसला आहे. 

हे ही वाचा -

Video : आऊट होताच पृथ्वी शॉचा पारा चढला, भर मैदानात मुशीर खानला बॅटने घेऊन मारायला धावला, नेमकं काय घडलं? Inside माहिती समोर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
Embed widget