एक्स्प्लोर
Advertisement
IND v NZ Test Series : भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलची कसोटी संघात वर्णी, मुंबईकर पृथ्वी शॉचं पुनरागमन
भारतीय संघाची घोषणा झाली असली तरी टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलेल्या सलामीवीर लोकेश राहुलला संघात स्थान मिळालेलं नाही.
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे उर्वरित न्यूझीलंड दौऱ्याला मुकावं लागल्यानंतर भारतीय संघांत मुंबईकर पृथ्वी शॉचं पुनरागमन करण्यात आलं आहे. तर एकदिवसीय संघात निवड झाल्यानंतर आता पहिल्यांद कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. पण टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला संघात स्थान मिळालेलं नाही.
भारतीय संघात हनुमा विहारी नवदीप सैनीनेही कसोटी संघात स्थान मिळवलं आहे. निवड समितीने इशांत शर्मालाही भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. पण तरीही तो संघात खेळेल की नाही हे त्याच्या फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे.
भारत-न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत वेलिंग्टन खेळवण्यात येईल. तर दुसरा सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत खेळण्यात येईल.
पृथ्वी शॉची कसोटी कारकीर्द
मुंबईकर पृथ्वी शॉने भारतासाठी ऑक्टोंबर 2018 वेस्ट इंडीजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पृथ्वी शॉने आत्तापर्यंत दोन कसोटी सामने खेळले असून 237 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एक अर्धशतकांचा समावेश आहे. उत्तेजक चाचणीच्या आरोपाखाली गेल्या वर्षी आठ महिने पृथ्वी शॉवर बंदी करण्यात आली होती.
असा असेल भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा (फिटनेस टेस्ट पास झाला तर)
संबंधित बातम्या
दुखापतीमुळे 'हिटमॅन' न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
NZvsIND : सलामीवीर लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडला
टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सुफडासाफ, टी 20 मालिका 5-0 ने जिंकली
टीम इंडियाचा सलग चौथा 'सुप्पर' विजय, शार्दुल ठाकूर, लोकेश राहुलची जिगरबाज खेळी
INDvsNZ T-20 Match | टीम इंडियाकडून सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा सनसनाटी पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement