एक्स्प्लोर
दुखापतीमुळे 'हिटमॅन' न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने या बातमीला दुजोरा दिलाय.
IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर रोहित शर्मा, दुखापतीमुळे वन-डे आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने एबीपी न्यूजला ही माहिती दिलीय. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. ज्यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावं लागलं होतं.
न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला यामुळे मोठा धक्का बसलाय. ट्वेंटी-20 मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाचे लक्ष वन डे आणि कसोटी मालिकेकडे लागले आहे. पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. रोहितनं पाचव्या सामन्यात 41 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 60 धावा काढल्या होत्या. रोहित शर्माच्या जागी आता वन-डे सामन्यात मयांक अग्रवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, कसोटीत के. एल. राहुलचं कॅमबॅक होण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ देखील या रेसमध्ये आहे.
NZvsIND : सलामीवीर लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडला
टीम इंडियाला दुखापतींचा -
न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचे एक-एक शिलेदार जखमी होतायेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच गोलंदाज ईशांत शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्याने बाहेर पडले होते. तर, काही दिवसांपूर्वी जखमी झालेला हार्दिक पंड्या देखील कसोटी टीम मधून बाहेर पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
क्रीडा
करमणूक
Advertisement