"मी निवडकर्ता असतो तर अय्यरला कोणत्याच संघात घेतलं नसतं...", पाकिस्तानच्या खेळाडूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ
Basit Ali on Shreyas Iyer : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत पण श्रेयस अय्यरची बॅट शांत राहिली.
Basit Ali on Shreyas Iyer : दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत पण श्रेयस अय्यरची बॅट शांत राहिली. इंडिया डी कडून खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने इंडिया सी विरुद्ध निराशाजनक कामगिरी केली आणि खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निराशाजनक कामगिरीनंतर अय्यरवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. दुसऱ्या फेरीत शानदार फलंदाजी करून तो भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी आपली दावेदारी मजबूत करेल, अशी अपेक्षा होती. पण अय्यर 7 चेंडूंचा सामना करत 0 धावांवर बाद झाला. मात्र, आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने अय्यरच्या खराब फलंदाजीवर आपला राग काढला आहे.
दरम्यान, आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने अय्यरच्या खराब फलंदाजीवर आपला राग काढला आहे. तो निवडकर्ता असता तर दुलीप ट्रॉफीसाठीही त्याची निवड केली नसती, असेही म्हटले आहे.
अय्यरच्या खराब कामगिरीबद्दल माजी पाकिस्तानी खेळाडू बासित अली म्हणाले की, 'एक क्रिकेटर म्हणून मला अय्यरला पाहून वाईट वाटते. जर तुम्ही बाद होत असाल तर तुमचे लक्ष खेळावर नसते. विशेषतः रेड बॉलमध्ये. त्याने वर्ल्ड कपमध्ये 2 शतके ठोकली आहे. तो आयपीएल जिंकणारा कर्णधारही आहे. त्याने 100-200 धावा करायला हव्या होत्या. अय्यरला रेड बॉलच्या क्रिकेटची भूक नाही. मी भारतीयांची माफी मागतो. पण मी निवडकर्ता असतो तर दुलीप ट्रॉफीमध्ये त्याची निवड केली नसती.
श्रेयस अय्यर 2024 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग होता. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला सलग संधी देण्यात आल्या. पण तो फारसा चमत्कार करू शकला नाही. अशा स्थितीत त्याला शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले. नंतर तो देशांतर्गत स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये सहभागी झाला नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अय्यरला केंद्रीय करारातून वगळले होते. मात्र, आता पुन्हा एकदा अय्यरने खराब फलंदाजी करत टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे बंद केले आहेत.
हे ही वाचा -
IND vs BAN : चेन्नईत होणार 'गेम', रोहित-गंभीरचा मोठा प्लॅन; 3-4 दिवसात बांगलादेशचा खेळ होणार खल्लास?