Bangladesh Squad Asia Cup 2025 : धडाकेबाज फलंदाजाची मैदानात एन्ट्री! भारत-पाकनंतर आशिया कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, 16 जणांची फौज सज्ज
Asia Cup 2025 Update News : भारत आणि पाकिस्ताननंतर बांगलादेशनेही आगामी आशिया कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

Bangladesh Squad for Asia Cup 2025 Announced Update : भारत आणि पाकिस्ताननंतर बांगलादेशनेही आगामी आशिया कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे. टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणारा हा स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, बांगलादेशने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात नुरुल हसन सोहन आणि सैफ हसन यांची पुनरागमन झाली आहे. संघाचे नेतृत्व लिटन दास करणार आहेत. बांगलादेश आपला पहिला सामना 11 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथील शेख जायेद स्टेडियमवर हाँगकाँगविरुद्ध खेळेल.
धडाकेबाज फलंदाजाची मैदानात एन्ट्री!
सोहनने शेवटचा सामना 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. अलीकडेच डार्विनमध्ये झालेल्या टॉप एंड टी20 मालिकेत बांगलादेश ‘ए’ संघाकडून खेळताना त्याने पाच सामन्यांत 109 धावा केल्या होत्या, ज्यात 35 धावांची सर्वोत्तम खेळी होती. सैफने शेवटचा सामना 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्याने 130 च्या स्ट्राइक रेटने 117 धावा करत चांगली कामगिरी केली होती.
Bangladesh squad is set for the Asia Cup 2025 in the UAE! 🇧🇩 Led by Litton Das, the Tigers are ready to roar with fresh energy and experience. 🔥🏏
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 22, 2025
Squad:
Litton Kumer Das (Captain), Tanzid Hasan, Parvez Hossain Emon, Saif Hassan, Tawhid Hridoy, Jaker Ali Anik, Shamim Hossain,… pic.twitter.com/8HTmOOJ9MW
लिटन दासकडे कर्णधारपद
झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या अलीकडील टी20 मालिकेत विजय मिळवून देणारा लिटन दासच संघाचे नेतृत्व करणार आहे. तंजीद हसन तमीम आणि परवेज हुसैन एमोन ओपनिंगची जबाबदारी सांभाळतील. श्रीलंका दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या महदी हसनला संधी देण्यात आली असून मेहदी हसन मिराज यांना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे.
गोलंदाजी विभागात तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांचा समावेश आहे. फिरकीमध्ये मेहदी हसनसोबत नसूम अहमद आणि रिशाद हुसैनअसतील. मधल्या फळीमध्ये जकर अली अनिक, तौहीद हृदोय आणि शमीम हुसैन जबाबदारी सांभाळतील.
बांगलादेशचा आशिया कप प्रवास
बांगलादेश 2012, 2016 आणि 2018 या तीन वेळा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, मात्र प्रत्येक वेळी उपविजेता ठरला. 2012 मध्ये पाकिस्तानने, तर 2016 आणि 2018 मध्ये भारताने बांगलादेशला पराभूत केले होते.
आशिया कप 2025 साठी बांगलादेश संघ (Bangladesh squad for Asia Cup 2025) :
लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हृदोय, झाकर अली अनिक, शमीम हुसेन, नुरुल हसन सोहन, शक मेहदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तनजीम हसन साकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन.
स्टँडबाय खेळाडू : सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, तन्वीर इस्लाम आणि हसन महमूद.
हे ही वाचा -





















