VIDEO : शाकीबची मुजोरी, सेल्फी मागायला आलेल्या चाहत्याचा गळा पकडला
Shakib Al Hasan : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) मैदानावर अनेकदा पंचासोबत वाद घालताना दिसला आहे.
Shakib Al Hasan : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) मैदानावर अनेकदा पंचासोबत वाद घालताना दिसला आहे. कधी तो खेळाडूशी बाचाबाची करताना दिसतो तर कधी तो पंचांशी भांडताना दिसतो. कधी चाहत्यांसोबत वाद घालतो. आताही असेच काहीसे घडले आहे. शाकीब अल हसन यानं एका चाहत्याचा गळा पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याचा शाकीबने गळा पकडला अन् त्याला झाप झाप झापले. याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. शाकीब अल हसन याचं हे वागण सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. शाकीब यानं असं कृत्य पहिल्यांदाच केलेले नाही, याआधीही त्यानं अनेकदा चाहत्यांसोबत गैरवर्तन केलेय.
शाकीबचा पारा चढला, चाहत्याची कॉलर पकडली -
व्हायरल व्हिडीओनुसार, शाकीब अल हसन ग्राऊंड स्टाफसोबत मैदानात उभा होता. त्याचवेळी एक चाहता तिथे पोहचतो. त्याला शाकीब अल हसन याच्यासोबत सेल्फी काढायचा असतो. त्यानं शाकीबकडे सेल्फी काढण्याची विनंती केली. तो त्यासाठी पुढे सरसवाला. पण शाकीब अल हसन याला चाहत्यावर राग अनावर आला. शाकीब अल हसन यानं सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याची कॉलर पकडली. चाहत्यासोबत शाकीबने धक्काबुक्की केल्याचेही दिसत आहे. शाकीब आणि चाहत्यांमध्ये बाचाबाची झाली. शाकीब हल हसन याने चाहत्याला पळवून लावले. या घटनेनंतर चाहता स्टेडियमवर जाऊन गुपचूप जाऊन बसतो.
Shakib al Hassan back to his original form. pic.twitter.com/jOke490EXl
— S. (@Safulakbar) May 7, 2024
आयपीएलमध्ये शाकीब का नाही खेळत?
मागील तीन हंगामात शाकीब अल हसन आयपीएलमध्ये खेळत नाही. त्यानं 2021 मध्ये आयपीएलमध्ये भाग घेतला होता. यंदा त्याच्यावर कुणीच बोली लावली नाही. 2021 मध्ये शाकीबने आठ सामने खेळले होते. त्यावेळी त्याची कामगिरी अतिशय सरासरी राहिली होती. त्याला फक्त 47 धावाच करता आल्या, त्यावेळी त्यानं फक्त चार विकेट घेतल्या होत्या. 2024 मध्ये शाकीब अल हसन आयपीएलच्या कोणत्याही संघाचा सदस्य नाही. कारण आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर कुणीच बोली लावली नाही. त्यानंतर त्यानं बांगलादेश क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी आपण माघार घेतल्याचेही सांगण्यात आले. शाकीब अल हसन यानं पीसीएलमधूनही आपलं नाव माघारी घेतलं होतं.
Of course he did bad.He denied to take selfie bcoz he was busy.That fan didn't listen to him.Still I will say Shakib shouldn't have done this.There is another side of him too but u people will not post about it bcoz u won't get reach for positive post. https://t.co/OPwvBTRbik
— Nasreen🧕🇧🇩 (@NA__SR__EEN3) May 7, 2024