BAN vs IRE : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 10 गडी राखून विजय, आयर्लंडविरुद्ध मालिकाही घातली खिशात
BAN vs IRE : आयर्लंडचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना बांगलादेशनं जिंकत मालिकाही 2-0 ने जिंकली आहे.
Bangladesh vs Ireland : बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत आयर्लंडचा (BAN vs IRE) 2-0 असा पराभव केला आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी सिलहटमध्ये खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने 10 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सर्वबाद 101 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 13.1 षटकांत हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. मुशफिकर रहीमची 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून निवड करण्यात आली. तर हसन महमूदची ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. तिसऱ्या वनडेत आयर्लंडला एका वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं.
आयर्लंडचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना बांगलादेशनं जिंकत मालिकाही 2-0 ने जिंकली आहे. कारण मालिकेतील पहिला सामना बांगलादेशनं 183 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळं अनिर्णीत राहिला. पण बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आणि मालिकाही 2-0 अशा फरकाने नावावर केली. या सामन्यात आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यादरम्यान आयर्लंडचा संघ अवघ्या 101 धावांवर ऑलआऊट झाला. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना हसन महमूदने 5 बळी घेतले. त्याने 8.1 षटकात 32 धावा दिल्या. तस्किन अहमदने 10 षटकांत केवळ 26 धावा देत तीन बळी घेतले. इबादत हुसेनलाही दोन बळी मिळाले. बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाने अवघ्या 13.1 षटकांत कोणताही बिनबाद विजय मिळवला. लिटन दासने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तमिमने 41 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने 5 चौकार मारले.
View this post on Instagram
बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विजयात याची नोंद झाली आहे. बांगलादेशने वनडे मालिकेतील पहिला सामना 183 धावांनी जिंकला. यानंतर दुसरा सामना पाऊस पडल्यामुळे पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर तिसरा सामना 10 गडी राखून जिंकला. बांगलादेशने त्यांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील विकेट्सच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी 2006 मध्ये संघाने केनियाचा 9 गडी राखून पराभव केला होता. बांगलादेशने झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचाही 9-9 विकेट राखून पराभव केला आहे.
हे देखील वाचा-