एक्स्प्लोर

Bob Simpson Dies : क्रिकेट विश्वावर शोककळा! भारतीय संघाचे मार्गदर्शक, ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑस्ट्रेलियन क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे 16 ऑगस्ट (शनिवार) रोजी सिडनी येथे निधन झाले.

Bob Simpson Passes Away Aged 89 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे 16 ऑगस्ट (शनिवार) रोजी सिडनी येथे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक या तिन्ही भूमिकांमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला मोठे योगदान दिले. सिम्पसन यांची ओळख अशा क्रिकेटपटूंमध्ये होते, ज्यांनी कठीण काळातून ऑस्ट्रेलियाला बाहेर काढून आणि जागतिक दर्जाची टीम बनवली. विशेष म्हणजे, 1999 च्या वनडे वर्ल्ड कपदरम्यान ते भारतीय संघासोबत कन्सल्टंट म्हणून जोडले गेले होते.

खेळाडू म्हणून कारकीर्द

बॉब सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी 62 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 46.81 च्या सरासरीने 4869 धावा केल्या, ज्यामध्ये 10 शतकं आणि 27 अर्धशतकं सामावलेली होती. 1964 मध्ये मँचेस्टर कसोटीत त्यांनी इंग्लंडविरुद्ध 311 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती, जी अ‍ॅशेस मालिकाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळ्यांपैकी एक मानली जाते. त्यांनी 2 एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यात 36 धावा केल्या. ते उत्कृष्ट स्लिप फिल्डर आणि उपयुक्त लेगस्पिन गोलंदाज होते. कसोटीत त्यांनी 71 तर वनडेमध्ये 2 बळी घेतले.

सिम्पसन यांनी 1968 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, केरी पॅकर वर्ल्ड सिरीजच्या काळात संघ संकटात असताना त्यांनी पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व केले. डिसेंबर 1957 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत पदार्पण केले होते, तर एप्रिल 1978 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन येथे आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. तोच त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून योगदान

सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाचे 39 कसोटी सामन्यांत नेतृत्व केले. त्यात 12 विजय, 12 पराभव आणि 15 सामने बरोबरीत सुटले. त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वनडे सामने झाले, ज्यात एक विजय आणि एक पराभव मिळाला. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली. 1986 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांनी तरुण संघात नवी उर्जा ओतली. कर्णधार ऍलन बॉर्डर आणि प्रशिक्षक सिम्पसन या जोडीने 1987 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून दिला. पुढे 1989 मध्ये इंग्लंडला हरवून अ‍ॅशेस जिंकले, तसेच 1995 मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर कसोटी मालिकेत विजय मिळवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांसारखे महान खेळाडू घडले.

1965 मध्ये त्यांची विज्डन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली. पुढे त्यांना ICC हॉल ऑफ फेम आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले. बॉब सिम्पसन यांना सदैव त्या खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून स्मरण केले जाईल, ज्यांनी संघाला विखुरण्यापासून वाचवून विजयाच्या मार्गावर नेले.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Embed widget