एक्स्प्लोर

AUS vs SA: ऑस्ट्रेलियानं केवळ दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारतालाही फायदा

AUS vs SA : ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Australia vs South Africa 1st Test : एकीकडे भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर असून दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत 6 गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर हा सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात नॅथन लायन आणि स्टार्कने प्रत्येकी 3-3 बळी घेतले. त्याचवेळी दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिन्सने 5 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 99 धावांत सर्वबाद केलं. विशेष म्हणजे भारतानंही बांगलादेशवर विजय मिळवला असून दक्षिण आफ्रिकेच्या या मोठ्या पराभवामुळे भारताला कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत (WTC Points Table) फायदा झाला आहे. भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी अत्यंत खराब झाली. ज्यामुळे त्यांनी सामना केवळ दोन दिवसांत गमावला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 152 धावा केल्या होत्या. यादरम्यान काईल व्हेरेनने 64 धावांची एकहाती झुंज दिली. यादरम्यान लायन आणि स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी भेदक गोलंदाजी केली. स्टार्कने 14 षटकात 41 धावा देत 3 बळी घेतले. लायनने 8 षटकांत 14 धावांत 3 बळी घेतले. तर पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिला डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्यांनी 218 धावा केल्या. यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने 92 धावांची शानदार खेळी केली. त्याने 96 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 1 षटकार ठोकला. अॅलेक्स कॅरी 22 धावा करून नाबाद राहिला. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. जेन्सनने 9 षटकांत 32 धावा देत 3 बळी घेतले.

99 धावांत दक्षिण आफ्रिका सर्वबाद

दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 99 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान संघाचे 4 खेळाडू खातं न उघडताच बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली.  कमिन्सनं 5 विकेट्स घेतल्या. त्याने 12.4 षटकात 42 धावा देत 3 मेडन ओव्हर्सही टाकल्या. तर स्टार्क आणि बोलंड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 35 धावा केल्या आणि सामना 6 विकेट्सनी जिंकला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget