एक्स्प्लोर

AUS vs NED : ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला लोळवले, 309 धावांनी उडवला धुव्वा; वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय 

Australia vs Netherlands : ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांनी धुव्वा उडवत विक्रम रचला आहे.

नवी दिल्लीक्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा (Australia vs Netherlands) 309 धावांनी धुव्वा उडवला आहे. वर्ल्डकपमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 400 धावांचे आव्हान नेदरलँड्सला पेलवलेच नाही. त्यांना 100 धावाही करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण नेदरलँड्सचा संघ 90 धावांमध्ये गुंडाळला. अ‍ॅडम झाम्पा (Adam Zampa) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवले. झाम्पाने 4 तर मार्शने 2 विकेट्स घेतल्या. 

मॅक्सवेलची वादळी खेळी

ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅक्सवेलच्या वादळी खेळीत नेदरलँडसच्या गोलंदाजीचा पालापाचोळा झाला. मॅक्सवेलने 44 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या. त्याने आपल्या 9 चौकार आणि 8 षटकार लगावले. मॅक्सवेलने दिल्लीत तुफानी फलंदाजी करत विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले. त्याने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.

डेव्हिड वॉर्नरचे विक्रमी शतक, स्मिथची महत्त्वाची खेळी

ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरनेही शतक झळकावले. सलामीवीर म्हणून त्याने 93 चेंडूंचा सामना करत 104 धावा केल्या. वॉर्नरच्या या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर, स्टीव्ह स्मिथने 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 68 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार लगावले. लॅबुशेनने 47 चेंडूत 62 धावा केल्या. पॅट कमिन्स 12 धावा करून नाबाद राहिला. मिचेल मार्श 9 धावा करून बाद झाला.

नेदरलँडचा संघ गडगडला

ऑस्ट्रेलियाने नेदरलँडला विजयासाठी 400 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात संपूर्ण संघ 21 षटकांत 90 धावा करून सर्वबाद झाला. सलामीवीर विक्रमजीत सिंगने 25 चेंडूत 25 धावांची खेळी साकारली. कॉलिन अकरमन 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. एंगलब्रेट २१ चेंडूत 11 धावा करून बाद झाला. बास डी लीडे अवघ्या 4 धावा करून बाद झाला. तेजा निदामनुरु 18 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. लोगान व्हॅन बीकला खातेही उघडता आले नाही. व्हॅन डर मर्वेही शून्यावर बाद झाला. आर्यन दत्त 1 धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाची प्रभावी गोलंदाजी

ऑस्ट्रेलियन संघांच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही नेदरलँडवर वर्चस्व गाजवले. फिरकीपटू अॅडम झाम्पाने 3 षटकांत केवळ 8 धावा देत 4 बळी घेतले. मिचेल मार्शने 4 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. पॅट कमिन्सने 4 षटकात 14 धावा देत एक विकेट घेतली. जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कनेही प्रत्येकी एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget