Ind vs Aus 5th Test Day-1 : सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 185 धावांवर ऑल आऊट; शेवटच्या चेंडूवर बुमराहने केली ख्वाजाची शिकार, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का
India vs Australia 5th Test Day-1 Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी शुक्रवारपासून सुरू झाली आहे.
LIVE
Background
Australia vs India 5th Test Day-1 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 185 धावांवर ऑलआऊट झाला आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून यष्टीमागे नऊ धावा केल्या. उस्मान ख्वाजा 2 धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सॅम कोन्स्टास 7 धावांवर नाबाद परतला.
टीम इंडियाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या. रवींद्र जडेजा 26 धावा करून बाद झाला. शुभमन गिलने 20 आणि विराट कोहलीने 17 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 4 तर मिचेल स्टार्कने 3 विकेट घेतल्या. पॅट कमिन्स 2 आणि नॅथन लायनच्या खात्यात एक विकेट आली.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तर आकाश दीप दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये. शुभमन गिलचे पुनरागमन झाले असून प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : सॅम कॉन्स्टॅन्स, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
Ind vs Aus 5th Test Live Day-1 : पहिल्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने केली ख्वाजाची शिकार
भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून यष्टीमागे नऊ धावा केल्या. दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ख्वाजाला आऊट केले. ख्वाजा आऊट होताच स्टंप घोषित करण्यात आला. ऑस्ट्रेलिया संघ सध्या 176 धावांनी पिछाडीवर आहे.
Ind vs Aus 5th Test Live Day-1 : टीम इंडिया पहिल्या डावात 185 धावांवर ऑलआऊट
भारताचा पहिला डाव 185 धावांवर आटोपला आहे. भारतीय संघ केवळ 72.2 षटकेच खेळू शकला. ऋषभ पंतने संघाकडून सर्वाधिक 40 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा 26, कर्णधार जसप्रीत बुमराह 22 धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली 17 धावा आणि यशस्वी जैस्वाल 10 धावा करू शकला. याशिवाय इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केएल राहुलला चार, प्रसिद्ध कृष्णाला तीन आणि मोहम्मद सिराजला तीन धावा करता आल्या. नितीश रेड्डी यांना खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने चार, तर मिचेल स्टार्कने तीन बळी घेतले. पॅट कमिन्सने दोन, तर नॅथन लायनला एक विकेट मिळाली.
Ind vs Aus 5th Test Live Day-1 : भारताला 168 धावांवर नववा धक्का
भारताला 168 धावांवर नववा धक्का बसला. कृष्णाला स्टार्कने झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या. सध्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत.
Ind vs Aus 5th Test Live Day-1 : भारताला 148 धावांवर आठवा धक्का, 14 धावा करून सुंदर तर नितीश रेड्डी शून्यावर आऊट
भारताला 148 धावांवर आठवा धक्का बसला. ऑनफिल्ड अंपायरने त्याला नॉट आऊट दिले. यानंतर तिसऱ्या पंचाने निर्णय बदलून सुंदरला आऊट दिला. सध्या जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा क्रीजवर आहेत.
Ind vs Aus 5th Test Live Day-1 : सलग दोन चेंडूंवर टीम इंडियाला दोन मोठे धक्के!
डावाच्या 57व्या षटकात 120 धावांवर भारताला सलग दोन चेंडूंवर दोन मोठे धक्के बसले आहे. स्कॉट बोलंडने ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांना आऊट केले. खराब शॉट खेळून पंत पुन्हा आऊट झाला. त्याचवेळी पुढच्या चेंडूवर बोलंडने नितीश रेड्डीला स्लिपमध्ये झेलबाद केले. पंत 40 धावा करू शकला. नितीश यांना खातेही उघडता आले नाही. सध्या जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर आहेत. पंतने जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली होती.