(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rachael Haynes Retires: ऑस्ट्रेलियाची स्टार महिला क्रिकेटर राचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Rachael Haynes Retirement: आगामी महिला बिग बॅश लीग हा तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, याचीही तिनं पुष्टी केलीय.
Rachael Haynes Retirement: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक विजेती रॅचेल हेन्सनं (Rachael Haynes) गुरुवारी (15 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. आगामी महिला बिग बॅश लीग ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, याचीही तिनं पुष्टी केलीय.
निवृत्तीची घोषणा करताना रॅचेल हेन्स म्हणाली की, "अनेक लोकांच्या पाठिंब्याशिवाय या स्तरावर खेळणं शक्य झालं नसतं. क्लब, राज्य, प्रशिक्षक, कुटुंब आणि मित्रांकडून, माझ्या क्रिकेटच्या प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्या लोकांची मी खूप आभारी आहे. विशेषत: मला माझे आई-वडील इयान आणि जेनी आणि जोडीदार लिया यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत."माझ्या कारकिर्दीत माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळेच मी इतके दिवस क्रिकेट खेळता आलं. त्यांनी नेहमीच मला उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. मला त्यांच्याकडून मैदानावर आणि मैदानाबाहेरील बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. तसेच एक व्यक्ती म्हणून नेहमीच चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यात मदत केली आणि क्रिकेटला मजेदार बनवलं."
ट्वीट-
रॅचेल हेन्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
हेन्सनं तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 6 कसोटी, 77 एकदिवसीय आणि 84 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत हेन्सनं 39.85 च्या स्ट्राईक रेटनं 383 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 2 हजार 585 धावांची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हेन्सनं दोन शतक ठोकली आहेत. तर, 19 अर्धशतक केली आहेत. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये तिनं 26.56 च्या स्ट्राईक रेटनं 859 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हेन्सनं 2017 च्या आयसीसी महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व केलंय. तसेच हेन्स ही तिच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखली जायची.
क्रिकेट | सामने | डाव | धावा | सर्वोच्च धावसंख्या | विकेट्स | स्ट्राईक रेट | शतक | अर्धशतक | झेल |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 6 | 11 | 383 | 98 | 2 | 39.85 | 0 | 3 | 3 |
एकदिवसीय | 77 | 71 | 2585 | 130 | 7 | 77.95 | 2 | 19 | 25 |
टी-20 | 84 | 56 | 850 | 69* | 4 | 117.72 | 0 | 3 | 29 |
हे देखील वाचा-