Pat Cummins : पॅट कमिन्सचा मोठा निर्णय! क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक; जाणून घ्या कारण
Australia vs India Gavaskar Trophy 2025 : भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने मोठी घोषणा केली आहे.
Pat Cummins takes long break : भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने मोठी घोषणा केली आहे. कमिन्सने दोन महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले आहे, जेणेकरून तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल. तो बऱ्याच काळापासून सतत क्रिकेट खेळत आहे, म्हणूनच तो सुट्टी घेत आहे. या कारणास्तव यूके दौऱ्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या ऑस्ट्रेलियन मर्यादित षटकांच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही.
पॅट कमिन्स 2024च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता आणि त्यानंतर फ्रँचायझी लीग अंतर्गत अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमध्ये तो खेळताना दिसला. मात्र, त्याला स्कॉटलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. याच कारणामुळे आता तो स्वत: पूर्ण ब्रेक घेऊन दमदार कमबॅक करण्याच्या मूडमध्ये आहे.
पॅट कमिन्सने ब्रेकमागचे सांगितले कारण
फॉक्स क्रिकेटशी बोलताना पॅट कमिन्सने ब्रेक घेण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, ब्रेकनंतर परत येणारा प्रत्येकजण थोडा ताजेतवाने असतो, तुम्हाला त्याबद्दल कधीही खेद वाटत नाही. सुमारे 18 महिन्यांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल झाल्यापासून मी सतत गोलंदाजी करत आहे. पण मला आता सात-आठ आठवडे चांगले मिळतील. त्यामुळे शरीर पुन्हा सावरता येईल, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल आणि तुम्ही गोलंदाजी करू शकता."
22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या आगामी आवृत्तीत पाच कसोटी सामने होणार आहेत. 2017 पासून ऑस्ट्रेलियाला ट्रॉफी उचलण्यात अपयश आले आहे, कारण भारताने सलग चार मालिका जिंकल्या आहेत. यामध्ये 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी पॅट कमिन्सला त्याच्या नेतृत्वाखालील संघाने भारताला हॅट्ट्रिक पूर्ण करण्यापासून रोखावे असे वाटते.