Team India in WTC Points Table : WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला खेळावा लागणार मोठा गेम; जाणून घ्या काय आहे नेमकं गणित
Team India World Test Championship Points Table 2025 : भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील आगामी कसोटी मालिका (IND vs BAN) 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्याने सुरू होणार आहे.
Team India in WTC Points Table : भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील आगामी कसोटी मालिका (IND vs BAN) 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्याने सुरू होणार आहे. यानंतर टीम इंडिया पुढील कसोटी मालिकेत न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामने होणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स अंतर्गत खेळल्या गेलेल्या या दोन्ही मालिका रोहित शर्मा आणि कंपनीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
आता हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय जमिनीवर मेन इन ब्लूचा रेकॉर्ड खूपच उत्कृष्ट आहे. टीम इंडियाने गेल्या 12 वर्षांपासून आपल्या मातीत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही आणि केवळ 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकू शकलेला नाही. त्याचबरोबर न्यूझीलंडला भारतीय मातीत एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत कसोटी मालिकेत दोन्ही संघांवर दडपण असेल.
टीम इंडियाला सलग दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. मात्र दोन्ही वेळा त्यांना शेवटच्या सामन्यात पराभव झाला. सध्या तरी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. रोहितची सेना यावेळीही अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी होईल, अशी भारतीय चाहत्यांना पूर्ण आशा आहे.
मात्र, यासाठी रोहितच्या सेनाला बॉर्डर-गावसकर स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला गुणतालिकेत किमान 65% गुण राखणे आवश्यक आहे. टीम इंडियाला अजूनही एकूण 10 कसोटी खेळायच्या आहेत आणि त्यापैकी सात जिंकावे लागतील.
🏏WTC point table🏏
— jakhar🌹💪 (@neta84228) August 16, 2024
🇮🇳India stand at the top of table .#dilematvi #GOLD #wtc #Cricket #Kursk #justiceformoumitadebnath #BengalHorror pic.twitter.com/MqdEFNyjMR
भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांचे कडवे आव्हान असणार आहे, अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि संघासाठी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नसेल. पण भारतीय संघांने मागिल दोन कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा त्याच्या घरच्या मैदानावर पराभव केला आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा टीम इंडियाचा वरचष्मा असेल. या दोन मोठ्या संघांदरम्यान होणाऱ्या या कसोटी मालिकेबद्दल चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूही खूप उत्सुक आहेत.