6,6,6... शाहीन आफ्रिदीच्या षटकांत मॅथ्यू वेडनं फिरवली मॅच; पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात
Pakistan vs Australia 2nd Semifinal : विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केलाय
![6,6,6... शाहीन आफ्रिदीच्या षटकांत मॅथ्यू वेडनं फिरवली मॅच; पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात australia beat pakistan in 2nd semi final icc mens t20 world cup 2021 dubai international cricket stadium 6,6,6... शाहीन आफ्रिदीच्या षटकांत मॅथ्यू वेडनं फिरवली मॅच; पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/12/dcb4eef0475c705bcc2e24c506bab15f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pakistan vs Australia 2nd Semifinal : विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केलाय. मॅथ्यू वेडच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केलाय. भारताविरोधात हिरो ठरलेल्या शाहीन शाह आफ्रिदीच्या एकाच षटकांत मॅथ्यू वेडनं सामना फिरवला. मॅथ्यू वेडच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत प्रवेश केलाय. मॅथ्यू वेड आणि स्टॉयनिसनं हारलेला सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं फिरवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात असमाधानकारक झाली. सुरुवातीलाच कर्णधार फिंच स्वस्तात माघारी परतला. एकतर्फी विजय मिळवण्याच्या दिशेनं पाकिस्तानने आगेकूच केली होती. मात्र, मॅथ्यू वेडनं 17 चेंडूत 41 आणि स्टॉयनिसनं 31 चेंडूत 40 धावांची खेळी करत सामना फिरवला.
अखेरच्या पाच षटकांत ऑस्ट्रेलियानं सामना फिरवला –
13 व्या षटकांत ऑस्ट्रेलियानं पाच गड्यांच्या मोबदल्यात 96 धावा चोपल्या होत्या. अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला अखेरच्या पाच षटकांत 62 धावांची गरज होती. अनुभवी मॅथ्यू वेड आणि स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. 16 व्या षटकांत 12 धावा, 17 व्या षटकांत 13 धावा चोपल्या. अखेरच्या 18 चेंडूत 37 धावा हव्या होत्या. त्यावेळी हसन अलीच्या एका षटकांत 15 धावा चोपत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं चोपला. त्यानंतर शाहीन आफ्रिदीच्या एका षटकांत लागोपाठ तीन षटकार लगावत मॅथ्यू वेडनं ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहचवलं.
न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना –
पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधीच इंग्लंडचा पराभव करत न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या 14 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे. 14 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वचषकावर नाव कोरणार का? की न्यूझीलंड पहिल्यांदाज टी-20 विश्वचषक उंचावणार?
फखर जमन – रिझवानची अर्धशतकी खेळी :
नाणेफेक गमवल्यानंतर पाकिस्तानकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुहम्मद रिझावा (52 धावा 67), बाबर आझम (34 बॉल 39 धावा), फखर जमान (32 बॉल 55 धावा, नाबाद), आसिफ अली (1 बॉल 0 धावा), शोएब मलिकनं 2 बॉलमध्ये 1 धाव केली. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून मिचेल स्टार्कनं 2 विकेट्स मिळवल्या. तर, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली.
मॅथ्यू वेडची तुफानी खेळी –
मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून डेव्हिड वॉर्नर (30 बॉल 49 धावा), अॅरोन फिंच (1 बॉल 0 धावा), मिचेल मार्श (22 बॉल 28 धावा), स्टीव्हन स्मिथ (6 बॉल 5 धावा), ग्लेन मॅक्सवेल (10 बॉल 7 धावा), मार्कस स्टॉयनिस (31 बॉल 40), मॅथ्यू वेडनं 17 बॉलमध्ये धमाकेदार खेळी करीत 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं एक षटक राखून पाकिस्तानवर विजय मिळवलाय. पाकिस्तानकडून शादाब खाननं 4 विकेट्स घेतल्या. तर, शाहीन आफ्रिदीला एक विकेट्स मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)