Ind vs Aus 4th Test : बॉक्सिंग-डे टेस्टआधी ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा! चौथ्या कसोटीत 2 तगड्या खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या Playing-11
भारत विरुद्ध मेलबर्न येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग-11ची घोषणा केली आहे.
Australia Playing-11 for 4th Test Vs India : भारत विरुद्ध मेलबर्न येथे होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग-11ची घोषणा केली आहे. 1-1 अशी बरोबरी असताना यजमान संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11 मुळे टीम इंडियाचे टेन्शनही वाढले आहे, कारण मेलबर्नमध्ये खेळण्यासाठी ट्रॅव्हिस हेड पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
दोन मॅच विनर्सची एंट्री
मेलबर्नचा किल्ला जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात दोन बदल केले आहेत. स्कॉट बोलँडचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. या वेगवान गोलंदाजाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पदार्पणाच्या सामन्यातच खळबळ उडवून दिली होती. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बोलंडने एकूण 7 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने कहर कहर करत 6 खेळाडूंची शिकार केली होती. संघातील दुसरा बदल युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास आहे, ज्याला नॅथन मॅकस्विनीच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. हा 19 वर्षीय फलंदाज मेलबर्नमध्ये पदार्पण सामना खेळणार आहे.
JUST IN: Australia's XI for the Boxing Day blockbuster is locked in | @LouisDBCameron #AUSvIND https://t.co/uILWQn8JJl
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2024
हेड पूर्णपणे तंदुरुस्त
ब्रिस्बेन कसोटीत दुखापत झाल्यामुळे हेडच्या तंदुरुस्तीबाबत चिंता होती. पण, हेडने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. कर्णधार कमिन्सने पत्रकारांना सांगितले की, हेड बरा आहे, आणि चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी हेड हे सर्वात मोठे टेन्शन आहे. आतापर्यंत त्याने मालिकेतील तीन कसोटी सामन्यांमध्ये 409 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतकांचा समावेश आहे.
चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग-11 : उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडे, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, यश दयाल.
हे ही वाचा -