एक्स्प्लोर

कांगारुंनी अखेरच्या दिवशी विश्वचषकाच्या संघात केला बदल, धाकड फलंदाजाची एन्ट्री

ODI World Cup 2023, Australia Team :  अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

ODI World Cup 2023, Australia Team:  अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त एश्टन अगर याच्या जागी मार्नस लाबुशेन याला विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. एश्टन एगर दुखापतग्रस्त झाला होता, त्याच्याजागी मार्नसला संधी दिली आहे. आयसीसीच्या नियमांप्रमाणे आयसीसीच्या संघात बदल करण्याची आज अखेरची संधी होती.

ऑस्ट्रेलियाच्या संघात एकमेव फिरकी स्पेशालिस्ट - 

विश्वचषकाच्या संघात एश्टन एगर आणि एडम जम्पा असे दोन फिरकी गोलंदाज होते. त्यामध्ये आता एगर स्पर्धेबाहेर गेला. त्याच्या जागी मार्नस लाबुशेन याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात फक्त एडम जम्पा हा एकमेव फिरकी गोलंदाज राहिलाय. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन हे फलंदाजही फिरकी गोलंदाजी करु शकतात. भारताविरोधातील अखेरच्या वनडे सामन्यात मॅक्सवेलने चार विकेट घेतल्या होत्या. मॅक्सवेल आणि लाबुशेन यांच्यावर फलंदाजीशिवाय गोलंदाजीचीही मोठी जबाबदारी असेल. 

पाच ऑक्टोबरपासून भारतामध्ये विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. या रनसंग्रामाला आठ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच अखेरच्या दिवशी कांगारुंनी मोठा बदल केला आहे.  खेळाडू एश्टन एगर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला. एश्टन एगरच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे विश्वचषकाला मुकणार आहे. वर्ल्ड कप संघात बदल करण्याची आज अखेरची संधी होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन याला संधी दिली. भारताविरोधात तीन सामन्याच्या मालिकेत मार्नसने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आलेय. 

ऑस्ट्रेलिया संघाचे संपूर्ण वेळापत्रक - 

विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना भारताविरोधात होणार आहे. चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना 12 ऑक्टोबरला लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर तिसरा सामना 16 ऑक्टोबरला लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध होईल. चौथा सामना 20 ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध होईल. २५ ऑक्टोबरला दिल्लीत पाचवा नेदरलँड विरुद्ध होणार आहे. सहावा न्यूझीलंडविरुद्ध २८ ऑक्टोबरला धर्मशाला येथे तर सातवा इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये लढत होईल. आठवा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ७ नोव्हेंबरला मुंबईत आणि नववा आणि शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध पुण्यात होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण वेळापत्रक

8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- चेन्नई  
12 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका- लखनऊ  
16 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका- लखनौ
20 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगळुरु
25 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड- दिल्ली  
28 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड- धर्मशाला में 
4 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- अहमदाबाद में
7 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान- मुंबई में
11 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- पुणे में. 

विश्व कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे शिलेदार -

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंगलिस, सीन एबॉट, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर, एडम जाम्पा आणि मिशेल स्टार्क.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice Chandiwal EXCLSUIVE : Anil Deshmukh यांना क्लीनचिट? न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखतJustice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Embed widget