एक्स्प्लोर

Year Ender 2022: वेस्टइंडीजच्या अल्झारी जोसेफचा मोठा पराक्रम; 2022 मध्ये घेतल्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स 

Year Ender 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं खास विक्रमाला गवसणी घातलीय.

Year Ender 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा ( Australia vs West Indies) वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं (Alzarri Joseph) खास विक्रमाला गवसणी घातलीय. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स (Most wickets in international cricket in 2022) मिळवण्याचा मान त्यानं मिळवलाय. या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यानं या वर्षी खेळल्या गेलेल्या 17 एकदिवसीय सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अल्झारी जोसेफ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा टीम साऊथी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 62 विकेट्सची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ट्रेन्ट बोल्टनं यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर नेपाळचा लामिछानेनं 54 विकेट्ससह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 53 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स:

क्रमांक गोलंदाज विकेट्स 
1 अल्झारी जोसेफ 65
2 टीम साऊथी 62
3 ट्रेन्ट बोल्ट 55
4 संदीप लामिछाने 54
5 कागिसो रबाडा 53

वेस्टइंडीचा प्रमुख गोलंदाज
जोसेफनं 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यानं कॅरेबियन संघासाठी आतापर्यंत 10 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात 7.47 च्या इकॉनामी रेटनं 16 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, त्यानं चार वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड. 

वेस्ट इंडीजचा संघ:
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, शमारह ब्रूक्स, जर्मेन ब्लॅकवुड, डेव्हॉन थॉमस, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकिपर), रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, अँडरसन फिलिप, मार्किनो मिंडले. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs LSG Live Score IPL 2026 : 10 षटकात, 117 धावा आणि 4 विकेट्स! चेन्नईत हाय-व्होल्टेज ड्रामा, जॉश इंग्लिशचे वादळ
CSK vs LSG Live : 10 षटकात, 117 धावा आणि 4 विकेट्स! चेन्नईत हाय-व्होल्टेज ड्रामा, जॉश इंग्लिशचे वादळ
Australian Cricket : पैशांनी फोडली ऑस्ट्रेलियन टीम? कमिन्सच्या मेगा सॅलरीनंतर 5 दिग्गजांनी उचललं बंडाचं पाऊल, क्रिकेटविश्व हादरलं
पैशांनी फोडली ऑस्ट्रेलियन टीम? कमिन्सच्या मेगा सॅलरीनंतर 5 दिग्गजांनी उचललं बंडाचं पाऊल, क्रिकेटविश्व हादरलं
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
RCB vs MI Live Update IPL 2026 : प्लेऑफसाठी जीवाची बाजी! रायपूरमध्ये 10 वर्षांनी IPLचा ब्लॉकबस्टर सामना, RCB-MI आमनेसामने
RCB vs MI Live Update : प्लेऑफसाठी जीवाची बाजी! रायपूरमध्ये 10 वर्षांनी IPLचा ब्लॉकबस्टर सामना, RCB-MI आमनेसामने

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
Embed widget