भारताला तिसरे गोल्ड मिळाले, घोडेस्वार टीमने 41 वर्षांनतर पटकावले सुवर्णपदक
India Wins Gold Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे.
India Wins Gold Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. घोडेस्वारी टीमने पदकावर नाव कोरलेय. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या घोडेस्वारी पथकाने 41 वर्षांनतर गोल्ड पदक मिळवत इतिहास रचलाय. भारतीय घोडेस्वारी सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंह, अंशु अग्रवाल आणि हृदय छेडा यांनी शानदार कामगिरी करत पदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी खेळामध्ये 40 वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. भारताचे घोडेस्वार अनुष, सुदीप्ती, दिव्यकीर्ती आणि हृदय यांनी अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताच्या टीमने 209.205 गुण मिळवले. दिव्यकीर्तीला 68.176 गुण, हृदयला 69.941 गुण आणि अनुषला 71.088 गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा 4.5 गुणांनी पुढे होता.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस चांगली होत आहे. भारताला तिसऱ्या दिवशी तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. भारताने श्रीलंका संघाचा 19 धावांनी पराभव केला होता. त्याआधी भारताने शूटिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. आज घोडस्वार टीमने तिसरे सुवर्ण जिंकून दिलेय. सध्या भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. मंगळवारी भारतीय खेळाडूंनी दोन कांस्य पदकेही पटकावली आहेत.
#EquestrianExcellence at the 🔝
— SAI Media (@Media_SAI) September 26, 2023
After 41 long years, Team 🇮🇳 clinches🥇in Dressage Team Event at #AsianGames2022
Many congratulations to all the team members 🥳🥳#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 🇮🇳 pic.twitter.com/CpsuBkIEAw
आज घोडेस्वार टीमने इतिहास रचला. तब्बल ४१ वर्षानंतर घोडेस्वारी प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ड्रेसेज इव्हेंटमध्ये भारताने गोल्ड मिळवले. या प्रकारात यजमान चीन दुसऱ्या स्थानी राहिला. चीनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनचे एकूण पॉइंट्स 204.882 इतके झाले. तर हाँगकाँग संघाला 204.852 पॉइंट्स मिळाले. हाँगकाँग संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याशिवाय ताइपे संघ चौथ्या क्रमांकावर तर यूएई टीम पाचव्या स्थानावर राहिला.
भारताला आपल्या आणखी खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे. महिला क्रिकेटनंतर पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे.
#EquestrianExcellence at the 🔝
— SAI Media (@Media_SAI) September 26, 2023
After 41 long years, Team 🇮🇳 clinches🥇in Dressage Team Event at #AsianGames2022
Many congratulations to all the team members 🥳🥳#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 🇮🇳 pic.twitter.com/CpsuBkIEAw