एक्स्प्लोर

मोठी बातमी : आशिया चषकासाठी कर्णधारपदाच्या नावावर BCCI कडून शिक्का, गिल की यादव, कर्णधाराचं नाव जाहीर!

क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर 2025 म्हणजे पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Asia Cup 2025 : क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर 2025 म्हणजे पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल की सूर्यकुमार यादव? सा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा आशिया कपमध्ये भारताचा कर्णधार असणार आहे. 

सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार 

भारताचा टी-20 चा कर्णधार सूर्यकुमार यादव हा पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. म्हणूनच आशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल? याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, आता याबद्दल घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव हाच आशिया कपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.  

अशिया कप स्पर्धा ही आशियाई क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा आहे.  ही स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने अद्याप या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. यामागील कारण सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसणे हे आहे. अमात्र, अशातच बीसीसीआयने भारतीय संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या नावाची घोषणा केली आहे. शुभमन गिल भविष्यात निश्चितच भारतीय संघाचा कर्णधार असेल, पण, 2026 च्या टी20 विश्वचषकानंतरच त्याला टी20 मध्ये कर्णधारपद मिळेल असं बोललं जात आहे. 

सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, सराव सुरु

मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव तंदुरुस्त झाला आहे. त्याने एनसीएमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सूर्याच्या तंदुरुस्तीची अधिकृत माहिती काही दिवसांत येईल. 2025 च्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार असणार आहे. 

आशिया स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? 

मिळालेल्या माहितीनुसार, 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी बीसीसीआय 2025 च्या आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारत गेल्या एक वर्षापासून टी-20 मध्ये वेगळ्या संघासोबत खेळत आहे. काही खेळाडूंनी त्यात चांगली कामगिरी देखील केली आहे. अशा परिस्थितीत, भारतीय व्यवस्थापन गेल्या एक वर्षात भारतासाठी टी-२० क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखवू शकते.

आशिया कपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ कसा असू शकतो?

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह.

महत्वाच्या बातम्या:

Asia Cup साठी कधी रवाना होणार टीम इंडिया, पहिला सामना कोणासोबत? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही; जाणून घ्या सर्वकाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget