एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान थरार, पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा, वाचा एका क्लिकवर

Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज हायव्होल्टेज सामना होणार आहे. साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता.

India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज हायव्होल्टेज सामना होणार आहे. साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आलेत.  पाकिस्तान संघाने सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात सात विकेटने विजय मिळवत दमदार सुरुवात केली.  त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. पण भारतीय संघाचेही पारडेही जड मानले जात आहे. जसप्रीत बुमराहच्या कमबॅकमुळे गोलंदाजीला धार आली आहे. त्याशिवाय केएल राहुलमुळे मधलीफळीची ताकदही वाढली. शनिवारी होणारा हायहोल्टेज सामना रंगतदार होणार, यात शंकाच नाही.  

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आयसीसी सामने वगळता इतर सामने होत नाही. त्यामुळे दोघांमधील लढत पाहण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढलेला असतो. भारतीय संघ चार वर्षानंतर पाकिस्तानविरोधात वनडेमध्ये दोन हात करत आहे. या सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांची नजर असेलच.. पण पाच खेळाडूंच्या कामगिरीमुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. या आघाडीच्या पाच खेळाडूबद्दल जाणून घेऊय़ात... 

1 – विराट कोहली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहलीची सर्वाधिक चर्चा होते. विराट कोहली याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आशिया चषकातील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या पाकिस्तानविरोधातच आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यातही विराट कोहलीकडून मोट्या खेळीची आपेक्षा असेल. विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने 50 पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहली भारतासाठी मॅच विनिंग खेळी करु शकतो.  विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

2 – बाबर आजम

नेपाळ विरोधात 151 धावांची खेळी करत बाबार आझम याने आशिया चषकाची दणक्यात सुरुवात केली. पण बाबरपुढे आता भारतीय आक्रमणाचे आव्हान असेल. नेपाळच्या दुबळ्या गोलंदाजीपुढे बाबरने धावांचा पाऊस पाडला. आता भारताविरोधात बाबर कशी कामगिरी करतो हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे. वनडेमध्ये बाबरला भारताविरोधात एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात बाबर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात.  

3 – रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सक्रिय असणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.42 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 6 अर्धशतके आणि 2 शतके झळकली आहेत. हायहोल्टेज सामन्यात कर्णधाराच्या कागिरीकडे लक्ष असेल. 

4 – शाहिन आफ्रिदी 

पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा शाहिन आफ्रिदी भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. शाहिनचा सध्याचा फॉर्मही चांगलाच दिसत आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात शाहिनने डावाच्या पहिल्याच षटकात नव्या चेंडूने दोन बळी घेतले होते. शनिवारी मोक्याच्या सामन्यात शाहिनच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा विजय अवलंबून असेल.

5 – जसप्रीत बुमराह

बूम बूम बुमराह मोठ्या कालावधीनंतर कमबॅक करतोय.. आशिया चषकात पाकिस्तानविरोधात बुमराह कशी गोलंदाजी करतो... याकडे क्रीडा चाहत्यांच्या नजरा आहेत. बुमराहच्या फिटनेससोबतच त्याचा फॉर्मही विश्वचषकापूर्वी संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अशा परिस्थितीत बुमराह पाकिस्तानविरुद्धच्या दडपणाने भरलेल्या सामन्यात कशी कामगिरी करतो, हे टीम इंडियासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत एकदिवसीय कारकिर्दीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या 5 सामन्यांमध्ये 48.75 च्या सरासरीने केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी सुधारण्याची संधी जसप्रीत बुमराहकडे असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget