![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुलचं जबराट कमबॅक, पाकिस्तानविरोधात शतक, टीकाकारांना दिले उत्तर
India vs Pakistan, KL Rahul Century : पाकिस्तानविरोधात शतक झळकावत केएल राहुल याने टीम इंडियात दमदार कमबॅक केलेय.
![राहुलचं जबराट कमबॅक, पाकिस्तानविरोधात शतक, टीकाकारांना दिले उत्तर Asia Cup 2023 India KL Rahul comback ODI century against Pakistan know his records stats राहुलचं जबराट कमबॅक, पाकिस्तानविरोधात शतक, टीकाकारांना दिले उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/c5f4445bbcbf7c7230723789eabe7cc61693301812004689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Pakistan, KL Rahul Century : पाकिस्तानविरोधात शतक झळकावत केएल राहुल याने टीम इंडियात दमदार कमबॅक केलेय. केएल राहुल याने या शतकी खेळीसह टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय. राहुल याच्या टीम इंडियातील निवडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल याने शतकी खेळी करत सर्वांनाच उत्तर दिलेय. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे केएल राहुल याला टीम इंडियात स्थान देण्यात आले होते. त्याच संधीचे राहुलने सोनं केलेय.
केएल राहुल याने जवळपास सहा महिन्यानंतर टीम इंडियात कमबॅक केले. राहुल याला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राहुल याने एनसीएमध्ये फिटनेसवर काम केले. राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. राहुल याला पाकिस्तानविरोधात संधी मिळाली, त्याचे त्याने सोनं केलेय. राहुल याने नाबाद 111 धावांची खेळी केली. केएल राहुल याने 106 चेंडूत दोन षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 111 धावांची खेळी केली. राहुलच्या या खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होतेय.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर राहुल याने चौफेर फटकेबाजी केली. श्रेयस अय्यरच्या जागी राहुलचा प्लेईंग 11 मध्ये समावेश झाला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्या फॉर्मवर खिळल्या होत्या. आशिया चषक स्पर्धेसाठी राहुलची संघात निवड झाली होती, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो साखळी सामन्यांदरम्यान खेळू शकला नाही. यानंतर त्याला सुपर-4 सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले. आज त्याने पाकिस्तानविरोधात टीम इंडियात कमबॅक केलेय. चौथ्या क्रमांकावर केएल राहुल याने दुसरे शतक ठोकलेय. तर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील त्याचे सहावे शतक होय.
KL Rahul is back in a grand style!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2023
What a century, he's here to dominate. pic.twitter.com/LYrY6ep5rS
विराट कोहलीसोबत द्विशतकी भागिदारी -
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी करत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी 194 चेंडूमध्ये 233 धावांची भागिदारी केली. विराट कोहली याने 94 चेंडूमध्ये नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने 9 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर केएल राहुल याने 106 चेंडूत 111 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
विराट कोहली 13 हजारी मनसबदार!
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने केला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. पाकिस्तानविरोधात 98 धावा करताच विराट कोहलीने 13 हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीने 267 व्या डावात 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 13 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी सचिन तेंडुलकर याला 321 डाव लागले होते. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या यांनी वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)