एक्स्प्लोर

IND vs NEP Weather Report : पाकिस्ताननंतर भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, पाहा हवामानाचा अंदाज

IND vs NEP : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पण नेपाळविरोधातील सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

India vs Nepal Asia Cup 2023 : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कँडी येथील पल्लेकल स्टेडिअमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतही याच मैदानावर शनिवारी झाली होती. पण पावसाच्या व्यत्यायामुळे सामना रद्द करावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी पावसाने खोडा घातला. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. भारताच्या दुसऱ्या साखळी सामन्यावरही पावसाचे संकट ओढावले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  पल्लेकल येथे दिवसाची सुरुवातच पावसाने होणा आहे. सकाळी आठ वाजता हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना तीन वाजता सुरु होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुपारी पावसाने विश्रांती घेती नाही, तर नाणेफेकीला उशीर होईल. त्याशिवाय, दिवसभर पावसाने खोडा घातल्यास सामना रद्दही होऊ शकतो. डकवर्थ लुईस नियमांनुसार, प्रत्येकी २०-२० षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे. पावसामुळे जितका वेळ वाया जाईल, तितके षटके कपात केली जाऊ शकतात.  

IND vs NEP Weather Report : पाकिस्ताननंतर भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, पाहा हवामानाचा अंदाज

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाने उसंत घेतली होती. पहिला डाव व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. पाकिस्तान संघाने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.   

कँडीमध्ये सोमवारी सकाळी 60 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाणेफेकीवेळी म्हणजे दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता २२ टक्के इथकी आहे. पण संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळी ६६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाचा खेळ होऊ शकतो.

IND vs NEP Weather Report : पाकिस्ताननंतर भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, पाहा हवामानाचा अंदाज

भारतासाठी आता करो या मरोची लढाई - 


पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.  भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 1st T20 LIVE Update : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; संघात 2 बदल, भुवनेश्वर कुमारबाबत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs NZ 1st T20 LIVE : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक; संघात 2 बदल, भुवनेश्वर कुमारबाबत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs NZ 1st T20 : भुवनेश्वर कुमार IN! न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने टाकला मोठा डाव, टीम इंडियात दोन धुरंधर परतले
भुवनेश्वर कुमार IN! न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरने टाकला मोठा डाव, टीम इंडियात दोन धुरंधर परतले
IND vs NZ 1st T20 Update : टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
टीम इंडियाचा आज न्यूझीलंडशी भिडणार, सामना किती वाजता, कुठे पाहाल? पहिल्या टी-20 मधील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Embed widget