Arshdeep Singh : 13 चेंडूची एक ओव्हर! अर्शदीप सिंगची लाइन-लेंथ बिघडली; गौतम गंभीर संतापला, रागात काय बोलून गेला... पाहा Video
Arshdeep Singh Record : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.

Arshdeep Singh 13-Ball Over T20I : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात (Ind vs Sa 2nd T20) भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असलेल्या अर्शदीपने या सामन्यात तब्बल 13 चेंडूची एक ओव्हर टाकली आणि 18 धावा दिल्या.
अर्शदीपच्या ओव्हरची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर क्विंटन डिकॉकने षटकार ठोकला. त्यानंतर तर अर्शदीपची पूर्णपणे लाइन-लेंथ बिघडली आणि एका ओव्हरमध्ये तब्बल 7 वाईड टाकल्या. यामुळे हेड कोच गौतम गंभीरही संतापले आणि मैदानावर त्याची नाराजीचा भाव दिसून आला.
भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी ओव्हर
या 13 चेंडूंच्या ओव्हरमुळे अर्शदीपच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. त्याने आयसीसी फुल मेंबर देशाच्या खेळाडूकडून टाकल्या गेलेल्या सर्वात मोठ्या ओव्हरच्या जागतिक विक्रमाचीही बरोबरी केली. मागील वर्षी अफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकने झिम्बाब्वेविरुद्ध 13 चेंडूची एक ओव्हर टाकली होती. तर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मगालाने पाकिस्तानविरुद्ध 12 चेंडूची ओव्हर केली होती.
No matter the situation, abusing a youngster is never justified. Shame on Gautam Gambhir for his actions towards Arshdeep Singh pic.twitter.com/05Ie1q4auy
— 𝐀𝐚𝐫𝐚𝐯𝐌𝐒𝐃𝐢𝐚𝐧™ (@AaravMsd_07) December 11, 2025
खलील अहमद आणि हार्दिक पांड्याच्या क्लबमध्ये प्रवेश
अर्शदीपपूर्वी भारतासाठी सर्वात मोठी टी-20 ओव्हर टाकण्याचा विक्रम संयुक्तरित्या खलील अहमद आणि हार्दिक पांड्याच्या नावावर होता. दोघांनीही 11 चेंडूची ओव्हर केली होती. अर्शदीप यापूर्वीही दोनदा 10 चेंडूची ओव्हर टाकली आहे.
टी20I मध्ये सर्वात मोठी ओव्हर टाकणारे भारतीय गोलंदाज
- अर्शदीप सिंग – 13 चेंडू (18 धावा) vs दक्षिण आफ्रिका, न्यू चंदीगड, 2025
- खलील अहमद – 11 चेंडू (11 धावा) vs श्रीलंका, पल्लेकेले, 2024
- हार्दिक पांड्या – 11 चेंडू (19 धावा) vs ऑस्ट्रेलिया, अॅडलेड, 2016
- अर्शदीप सिंग – 10 चेंडू (13 धावा) vs आयर्लंड, न्यूयॉर्क, 2024
- अर्शदीप सिंग – 10 चेंडू (6 धावा) vs वेस्ट इंडीज, तारौबा, 2023
डिकॉकने अर्शदीपची घेतली ‘क्लास’, कोच गौतम गंभीरही संतापला
पहिल्या टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समाचार घेतलेल्या अर्शदीपची दुसऱ्या सामन्यात मात्र क्विंटन डिकॉकने जोरदार धुलाई केली. अर्शदीपने फक्त 4 ओव्हरमध्येच 54 धावा खर्च केल्या. त्याचे असे खराब प्रदर्शन पाहून डगआउटमध्ये बसलेला हेड कोच गौतम गंभीर स्पष्टपणे नाराज दिसत होता. त्यावेळीचा गौतम गंभीर व्हिडिओ व्हायरल होते आहे, ज्यामध्ये तो काय तरी बोलत आहे.
हे ही वाचा -





















