Andre Russell IPL Retirement : आंद्रे रसेलच्या धडाकेबाज निर्णयामुळे सगळेच चक्रावले, IPL मधून घेतली निवृत्ती, KKRनं दिली सर्वात मोठी जबाबदारी
Andre Russell IPL Retirement Marathi News : कोलकाता नाईट रायडर्सचा कणा मानल्या जाणाऱ्या आंद्रे रसेलने अखेर आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Andre Russell IPL Retirement News : कोलकाता नाईट रायडर्सचा कणा मानल्या जाणाऱ्या वेस्टइंडीजच्या धडाकेबाज ऑलराउंडर आंद्रे रसेलने अखेर आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा निर्णय ऐकून सर्वजण थक्क झाले, कारण रसेल अजूनही जगभरातील टी20 लीग्जमध्ये तुफान कामगिरी करत आहेत. केकेआरने त्याला आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी रिलीज केल्यानंतर रसेलने हा मोठा निर्णय घेतल्याचे समजते.
Hanging up my IPL boots… but not the swagger 💜💛
— Andre Russell (@Russell12A) November 30, 2025
What a ride it’s been in the IPL — 12 seasons of memories, and a whole lot of love from the @KKRiders family 🙏🏿
I’ll still be smashing sixes and taking wickets in every other league around the world 🌎🔥
And the best part?… pic.twitter.com/S5kU0YFRcR
मात्र, रसेलने आयपीएलमधील खेळाडूचा प्रवास संपवला असला. तरी केकेआर सोडणार नाही हे त्याने स्पष्ट केले आहे. पुढील हंगामात तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत दिसणार असून, आयपीएल 2026 मध्ये तो केकेआरचा सपोर्ट स्टाफ सदस्य असेल.
Knights Army, presenting your 𝐏𝐎𝐖𝐄𝐑 𝐂𝐎𝐀𝐂𝐇 💪💜 pic.twitter.com/sOLEnEMCva
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 30, 2025
आंद्रे रसेल काय म्हणाला?
रसेलने आपल्या निवृत्तीची घोषणा करताना लिहिले की, “मी आयपीएल मधून निवृत्त होत आहे… पण माझा स्वॅगर नाही. IPLचा प्रवास अविस्मरणीय होता. 12 सीझनच्या आठवणी, KKR परिवाराकडून मिळालेला अमाप प्रेम. जगभरातील इतर प्रत्येक लीगमध्ये षटकार मारत राहीन आणि विकेट घेत राहीन. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे? मी घर सोडत नाहीये... तुम्हाला मी नवीन भूमिकेत दिसेन, KKRच्या सपोर्ट स्टाफमध्ये, 2026 च्या पावर कोच म्हणून. नवीन अध्याय. तीच ऊर्जा. नेहमीच एक नाइट.
1️⃣2️⃣ years, a million memories. Thank you for everything @Russell12A 💜🫶 pic.twitter.com/ijzY68fAdG
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 30, 2025
आंद्रे रसेलने आयपीएल करिअरला सुरुवात KKRसोबत नव्हे, तर 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून केली होती. दोन हंगाम दिल्लीसाठी खेळल्यानंतर 2014 मध्ये तो केकेआरमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच सीझनमध्ये संघाला चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावली. 2014 ते 2025 सतत तब्बल 12 वर्षे रसेल केकेआरचा अविभाज्य भाग राहिला. आयपीएल कारकिर्दीत रसेलने एकूण 140 सामने, 2651 धावा आणि 123 विकेट्स अशी प्रभावी नोंद केली आहे.
हे ही वाचा -




















